sanjay nirupam Meets BJP MP Ashok Chavan : राज्यासह देशात सर्वच राजकीय पक्षांनी सध्या लोकसभा निवडणुकीची तयार सुरू केली आहे. यादरम्यान जागावाटपाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या पक्षातील मतभेद समोर येत आहेत. यादकम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी रात्री भाजप नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. संजय निरूपम हे काल रात्री भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार दिला जाणार असल्याने संजय निरुपम नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. संजय निरूपण यांनी देखील पत्रकार परिषद घेत याबद्दल उघड नाराजी बोलून दाखवली आहे. यानंतर आथा निरुपम हे थेट अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) या घटक पक्षांमधील वादाचे कारण मुंबई उत्तर पश्चिम जागा बनू शकते. कारण काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंनी या जागेवर उमेदवार जाहीर केल्यावर मोठा हल्ला चढवला होता.
निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवेसनेवर टीका करताना की, म्हणाले होते की उरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी अंधेरी उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेवरून एमव्हीएचा उमेदवार जाहीर केला आहे. हे कसे शक्य होईल? तसेच दोन डझन एमव्हीए बैठका असूनही, जागा वाटपाचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. ही जागाही प्रलंबित असलेल्या ८-९ जागांपैकी आहे. मग शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? असा प्रश्नही निरूपम यांनी केला होता.
मुंबईच्या उत्तर पश्चिम जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवार बनवण्यात आले आहे. यानंतर वाद पेटला असून संजय निरुपम यांनी याविरोधातील नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.