sanjay pawar shivsena rajyasabha election  esakal
मुंबई

२० वर्षे विधानसभेची वाट पाहणाऱ्या संजय पवारांची राज्यसभा सुद्धा हुकली : Rajyasabha Election Result

स्नेहल कदम

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपकडून यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती. दरम्यान, काल (शुक्रवार) या निवडणुका पार पडल्या असून आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुक प्रक्रियेत लक्षवेधक आणि प्रतिष्ठेची निवडणुक ठरली आहे की कोल्हापूरच्या भाजप आणि शिवसेना उमेदवारांची.

राज्यात राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्या तशा विविध नाट्यमय राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा अपक्ष लढणार असल्याची घोषणा करत इतर पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यानंतर राष्ट्रवादीने पाठिंबा देण्याचे कबूल केले मात्र ऐनवेळी त्यांनी शब्द फिरवला. त्याचवेळी शिवसेनेने संभाजी राजेंना पक्षप्रवेशाची अट घातली. पंरतु राज्यसभा अपक्ष लढवण्यावर संभाजीराजे ठाम राहिले आणि त्यांनी या लढतीतून माघार घेतली.

दरम्यान, भाजपाने राज्यसभेसाठी राजकीय खेळी खेळत धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे कोल्हापूरच्या राजकारणाकडे लक्ष लागले. राज्यसभेसारख्या देश पातळीवरील सर्वोच्च सभागृहात संजय पवार यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला संधी देऊन शिवसेनेने कार्यकर्त्याचे सोने केले असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होती.

कोल्हापुरात शिवसेनेची जागा निवडणून येणार अशी चर्चा असताना राज्यसभेच्या जागेवर भाजपाने बाजी मारली आहे. धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा विजयाचा गुलाल लावून कोल्हापूरच्या राजकारणात दमदार एंट्री केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मविआची 9 मते फुटली आहेत. शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत, काँग्रेसचे (Congress) इमरान प्रताप गढी, राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले.

पहिल्या पसंतीची संजय पवार यांना ३३ आणि धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली. पहिल्या फेरीमध्ये भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८-४८ मते मिळाली. त्यामुळे त्यांच्या मताचा फायचा हा धनंजय महाडिक यांना झाला. दुसऱ्या फेरीची मतमोजणीत ते विजयी झाले. भाजपने आपली खेळी यशस्वी करत आपला सहावा उमेदवार निवडून आणला आहे. दरम्यान, थेट पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘गुडबुक’मध्ये पोहोचलेले संजय पवार यांना पुन्हा एकदा राजकारणाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे संजय पवार यांची नाराजी समोर आली आहे. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम पाहिले असतानाही त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.

संजय पवार हे कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जवळपास मागील 25 ते 30 वर्षे त्यांनी शिवसेनेत काम केले आहे. ते सध्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ते मूळ ग्रामीण भागातील आहेत. यावेळी ग्रामीण भागातील उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याचे शिवसेनेने ठरवले. एकीकडे संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी नाकारून सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याने याचे कौतुक झालं होतं.

जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या कार्यांमध्ये संजय पवार यांचे नाव अग्रेसर असते. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी संजय पवार यांची ओळख आहे. कोल्हापूर शहरातून विधानसभा लढवण्यासाठी गेले २० वर्षे ते तयारी करत आहेत. प्रत्येकवेळी उमेदवारीची चर्चा होते मात्र प्रत्यक्षात निर्णयावेळी त्यांचे नाव खालच्या लिस्टला येत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले पवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली होती.

सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी त्यांची महापालिकेत ओळख होती. यामुळे पवार हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले होते. संजय पवारांचे नाव गेले २० वर्षे कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जाते. पण प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नव्हती. करवीर तालुका प्रमुख, चार वर्षे शहरप्रमुखपदी काम केलेले पवार गेली १४ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. युतीचे सरकार असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपदीही त्यांना संधी मिळाली. राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे हे पद होते. पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांचे हे पद गेले.

यावेळी शिवसेनेने या कार्यकर्त्याला संधी दिली होती. मात्र नियतीने त्याला साथ दिली नसल्याचे चित्र दिसत आहे. हाता तोंडाशी आलेला राज्यसभेच्या जागेचा घास भाजपाने हिसकावून घेत बाजी मारली आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या राजकारणात महाडिकांची पुन्हा एकदा दमदार एंट्री झाल्याने आता बंटी-मुन्ना संघर्ष उफाळून येणार का अशा चर्चांना उत आला आहे. राजकारणाचे बदलापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात आता पुढील राजकारण कसे असणार यावर अंदाज बांधले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT