Sanjay Raut 
मुंबई

वजीर, आत्मसन्मान मेला तर...; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत

संजय राऊत आज पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी एक ट्विट केलं असून आपण अजूनही लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ईडीच्या चौकशीला जातानाचा आणि गळ्यात भगवा पंचा घेतलेला आपला एक फोटोही ट्विट केला आहे. (Sanjay Raut latest tweet during ED enquiry)

राऊत यांनी हिंदी भाषेत ट्विट केलं असून यामध्ये ते म्हणतात, "बुद्धिबळाच्या खेळात वजीर आणि जीवनातील आत्मसन्मान जर मेला तर समजा खेळ खल्लास. आमचा वजीर आणि आत्मसन्मान अद्याप जिवंत आहे. त्यामुळं आम्ही वाचू आणि लढू देखील. जय महाराष्ट्र"

विशेष म्हणजे संजय राऊत यांनी आपलं हे ट्विट मुख्यमंत्री कार्यालय, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, प्रियंका गांधी, आदित्य ठाकरे, कन्हैय्या कुमार, भाजप या सर्वांना टॅग केलं आहे. राज्य विधीमंडळामध्ये आज विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं हे ट्विट चर्चेत आहे.

संजय राऊत यांची काल (शनिवार) तब्बल १० तास ईडीकडून चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांची आज पुन्हा चौकशी होण्याची चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT