naresh mhaske and sanjay raut Sakal
मुंबई

Naresh Mhaske : संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत, पाठींबा दर्शविला होता; नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - अयोध्यामध्ये मी स्वत: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो. यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असे सांगितले असल्याचा गौप्यस्फोट शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी केला. शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरु होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आयोध्याच्या मुद्यावरुन म्हस्के यांना हा गौप्यस्फोट केला.

गद्दारी राजन विचारे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची केली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. एक महिन्यापासून काम करतात, मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे काँग्रेसकडे पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असे बोलणे साफ चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रा तरी बदलला आहे का ? त्यांच्याकडे टिका करण्यापलिकडे आता काही शिल्लक राहिलेले नसल्याची टीका देखील म्हस्के यांनी केली. आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केली आहे. संस्कृती परंपरा टिकविण्याचे काम आम्ही केले असल्याचेही ते म्हणाले.

ही प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली असल्याचे ते म्हणाले. राज घराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने राजकारणात उतरवणे हेच मुळात चूक आहे, शाहु महाराजांचा पराभव त्यांनी स्विकारला असल्यानेच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत.

दरम्यान म्हस्के यांची प्रचार रॅली  मीनाताई ठाकरे चौक, कॅसलमील नाका, आदर्शनगर, कोलबाड रोड, उथळसर, दादापाटील वाडी, टेकडी बंगला, चंदनवाडी शाखा आदी भागातून फिरली. त्यानंतर  धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तीस्थळ, खारटन रोड, भंडार आळी, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी मार्केट अशा भागातून गेली. ठाणे शहरातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा घरा-घरांमध्ये प्रचार सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT