Sanjay Raut News Sakal
मुंबई

Target Killing | गालांना रंग, गळ्यात हात... राऊतांनी थेट फोटोच शेअर केला!

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी सातत्यानं लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandit) खोरं सोडलंय. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदूंनी काश्मीर (Kashmir Target Killing) सोडल्याचं वृत्त समोर आलं. त्यामुळं काश्मिरातील हिंदू वस्त्या पुन्हा ओस पडू लागल्या आहेत. (Sanjay Raut on Targeted Killing)

या घटनांचं प्रमाण वाढल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आढावा बैठक घेतली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे कार्य सुरू आहे. मात्र भितीमुळे स्थलांतराला सुरुवात झाली आहे. दरम्यान, काँग्रेससह अन्य पक्षांनी भाजपला याच मुद्द्यावरून जाब विचारायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने देखील आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.(Sanjay Raut Tweet)

ज्या लोकांनी काश्मीर फाईल्स या सिनेमाची जाहिरात करून ४००-५०० कोटी रुपये कमावले, ते कुठे आहेत असा सवाल सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सध्या खोऱ्यात काश्मिरी पंडीत रक्तबंबाळ होत असताना केंद्र सरकार निष्फळ ठरल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

काश्मीर फाईल्स सिनेमा आल्यानंतर त्याची स्टारकास्ट पल्लवी जोशी, अनुपम खेर तसेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मोदींनीही या सिनेमाचं कौतुक केलं होतं. अनेक ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी या चित्रपटाची मोफत तिकिटं वाटली. मात्र आता काश्मिरी पंडितांच्या हत्या होत असताना भाजपचे नेते शांत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी फोटो शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

राऊत यांचं ट्वीट

काश्मिरी पंडितांना ठार मारलं जातं आणि खोरे सोडण्यास भाग पाडलं जातंय. ज्यांनी #KashmirFiles चा प्रचार केला ते मूक आहेत! सध्याच्या परिस्थितीवर ते आता काश्मीर फाइल्स-२ बनवतील का? पंतप्रधान या सीक्वलचाही प्रचार करतील का? जर इतिहास लपवला जाऊ नये, तर वर्तमानात काय सुरू आहे, याचा स्वीकारही केला नाही पाहिजे, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT