Sanjay Raut News e sakal
मुंबई

शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांना वाचवा, राऊतांचा निशाणा

सकाळ डिजिटल टीम

काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्यांचं प्रमाण पुन्हा एकदा वाढलं आहे. बँकेतील कर्मचाऱ्याची हत्या, त्यानंतर कामगारांच्या हत्येने खोऱ्यात पुन्हा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मोठ्या प्रमाणात फौज तैनात करण्यात आली आहे. खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात स्थालांतराला सुरुवात झाली आहे. गृहमंत्री अमित शाहांनी तत्काळ सुरक्षेच्या कारणावर बैठक बोलावली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut News)

काश्मिरात लोकांचं पलायन सुरू आहे. आजही दोघांची हत्या झाली आहे. पंडितांना टार्गेट करून मारण्यात येत आहे. लोकांचं स्थलांतर सुरू आहे. भाजपने यावर भाष्य करावं, असं राऊत यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut on Kashmiri Pandit Killings)

हे कृत्य कोणी अन्य पक्षांच्या सत्तेत झालं असतं तर भाजपने हिंदुत्वाच्या नावावर रान उठवलं असतं. त्यामुळे आता मंदिरांसाठी संघर्ष कऱण्यापेक्षा पंडितांना सुरक्षा पुरवण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. सरसंघचालक मोहन भागवर यांनी प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याचं थांबवलं पाहिजे असं म्हटलं होतं. भागवतांच्या या भूमिकेला मी समर्थन देतो, असं राऊत म्हणाले. शिवलिंग शोधत बसण्यापेक्षा काश्मिरी पंडितांची हत्या थांबवावी, असा सल्ला त्यांनी दिलाय.

'काश्मीर फाईल्स-०२' साठी जबाबदार कोण?

काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या नावाने निर्मात्याने कोट्यवधी पैसे कमावले. पण पंडितांच्या नशिबी फक्त पलायनच आहे. आज जे पलायन सुरू आहे त्यावर 'काश्मीर फाईल्स-०२' असा चित्रपट काढावा आणि त्यासाठी कोण जबाबदार याची माहिती लोकांसमोर आणली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या भेटीला

मविआ सरकारचे नेते राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी छगन भुजबळांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. हे एक अत्यंत चांगलं पाऊल असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. जबाबदार नेते आहेत.

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण चिघळण्याची परिस्थिती आहे. राज्यातील आमदारांना प्रलोभनं दाखवली जात आहेत. आमदारांना मोठा पैसा दिला जात आहे. याची चौकशी ईडीन करावी, अशी मागणी राऊत यांनी केली. कोण पैसे देत आहे, याची चौकशी केंद्रीय यंत्रणांनी करावी. घोडेबाजार टाळण्यासाठी मविआ ने हे चांगलं पाऊल उचलल्याचं त्यांनी म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT