मुंबई

मुंबई महापालिकेचा 'हा' हेल्पलाईन नंबर नोंद करुन ठेवा

सकाळ वृत्तसेवा


मुंबई- कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमानं घातल आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा उच्चांकी गाठतोय. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. कोविड केअर सुविधेविषयीच्या तक्रारी नागरिक आता 1916 या हेल्पलाईन नंबर दाखल करु शकणार आहेत. बीएमसीनं तसं मुंबई हायकोर्टाला आश्वासन दिलं आहे. रुग्णांना हेल्पलाइन नंबरद्वारे नॉन कोविड बेडची उपलब्धतेची माहिती देखील मिळू शकणार आहे. कोरोना रुग्णांसाठी जवळच्या कोणत्या रुग्णालयात जागा होऊ शकेल हे तात्काळ समजण्यासाठी हेल्पलाईनवर आता खास सोय करण्यात आली आहे.

यापूर्वी मुख्य न्यायाधीश दीपाणकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए.ए. सय्यद यांच्या खंडपीठाने कोविड -19 संबंधित याचिकेवरील सुनावणी दरम्यान ही सूचना केली होती. हेल्पलाईन क्रमांक –1916 वर नागरिकांना पर्याय 4 वर तक्रारी नोंदविण्यास परवानगी असेल आणि कोविड नसलेल्या रुग्णांना पर्याय 5 वर माहिती दिली जाईल.

पालिकेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अनिल साखरे म्हणाले की, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आयसीयू बेड आणि एकूण आकडेवारीसह बेडची उपलब्धता देणारे कागदपत्र पालिकेच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येतील. विविध रुग्णालयांमध्ये 'कोविड' बाधित रुग्णांसाठी असलेल्या खाटांपैकी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती सध्या नियमितपणे अद्ययावत केली जात आहे. तसंच, लवकरच ही माहिती 'रियल टाईम' पद्धतीने देखील अद्ययावत करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

सध्या, बीएमसी हेल्पलाईन क्रमांकावर चाचणी माहिती पुरवण्यासाठी पर्याय 1, पर्याय 2 हा रुग्णवाहिकेसाठी, बेड उपलब्धता आणि बुकिंगसाठी पर्याय 3, सामान्य माहितीसाठी पर्याय 4. mcgm.gov.in या संकेतस्थळावरुन बीएमसीच्या वेबसाइटवर जाता येतं आणि ‘stop corona virus’ ची लिंक ही वेबसाइटच्या डाव्या कोपऱ्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test Series : ऋतुराज गायकवाड पर्थ कसोटीत सलामीला खेळणार? भारत अ संघाच्या २ फलंदाजांना BCCI थांबवणार

स्टार प्रवाहने केली आणखी एका नव्या मालिकेची घोषणा ; 'या' गाजलेल्या हिंदी मालिकेचा आहे रिमेक

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Latest Maharashtra News Updates live : अमित शाहांचे आजचे सभा दौरे रद्द

Beed Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पांढरवाडी फाटा येथे ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT