ठाणे : ठाणे जिल्हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला असून सर्व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच प्रभाग समितीमधील जे दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्यांची दुकाने सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व परिमंडळ उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सिंघल यांनी मंगळवारी (ता. 21) सर्व अधिकाऱ्यांची बैठक कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीमध्ये त्यांनी बाधित व्यक्तींच्या संपर्कातील अति जोखीम गटातील व्यक्तींची माहिती आणि ज्या ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. याबाबत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नक्की वाचा : केंद्रीय पथकापुढे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा काढला 'हा' महत्त्वाचा विषय; मोदी देणार का परवानगी ?
तसेच विलगीकरण कक्षातील व्यक्तींचे अहवाल ही लवकरात लवकर तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश ही त्यांनी दिले. तसेच बाधीत रूग्णांच्या संख्येनुसार प्रभाग समितीनिहाय रेड झोन आणि झोन निश्चित करून त्याची माहिती तात्काळ मुख्यालयास कळवावी. तसेच प्रभाग समितीमध्ये हॅाटस्पॅाट असल्यास त्या अनुषंगाने नियोजन करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही सिंघल यांनी या बैठकीत दिल्या.
Seal the shops of law breakers Order of Thane Municipal Commissioner
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.