Mumbai Local Train women safety esakal
मुंबई

Mumbai Local Train : मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा होणार भक्कम

सकाळ वृत्तसेवा

- नितीन बिनेकर

मुंबई : लोकल ट्रेनच्या महिला डब्यातून महिला प्रवाशांचा रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, याकरिता लोहमार्ग पोलीसांचे महिला डब्यात क्युआर कोड लावण्याचे नियोजन सुरु आहे. यामुळे लोकलच्या महिला डब्यात पोलीस उपस्थित आहे कि नाही.

याची माहिती हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर मिळणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना रात्री सुरक्षित लोकल प्रवासाचे नियोजन करता येणार आहे. या 'क्यूआर कोड' महिला प्रवाशांच्या प्रवास आणखी सुरक्षित आणि सोईसकर होईल.

मुंबई उपनगरीय लोकल सेवांमधून दररोज ७० ते ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यात महिला प्रवाशांची संख्या २० लाखांहून अधिक आहे. रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यांत रेल्वे पोलीस तैनात असतात.

मात्र कोरोनानंतर हा निर्णय काटेकोरपणे पाळला जात नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच धावत्या लोकलमध्ये महिला डब्यात महिलांवर विनयभंगाच्या दोन घटना घडल्या आहे. या घटनेमुळे महिला रेल्वे प्रवाशांची सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

या घटनेची दखल घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षितेबाबत तात्काळ बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत मध्य, पश्चिम रेल्वे, आरपीएफ पोलीस, लोहमार्ग पोलिस आणि दक्षता समितीच्या सदस्य सुद्धा उपस्थितीत होते. या बैठकीत महिला प्रवाशांना सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यात आला. तसेच रात्री महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी अनेक उपयोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते.

क्युआर कोड ?

प्रत्येक ट्रेनमध्ये महिला डब्यामध्ये क्यूआर कोड बसविण्यात यावा. जेणेकरून ट्रेमधील कोणत्या कोचमध्ये पोलीस उपस्थित आहे. हे महिलांना क्युआर कोड स्कॅन करून समजू शकेल, त्यामुळे महिला धीर मिळण्यास मदत होणार आहे.

यांसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सूचना प्रशासनाला केल्या आहे. लोहमार्ग पोलिसांकडून प्रायोगिक तत्वावर क्यूआर कोड लावण्याची योजना आखात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर सर्व महिला डब्यात क्यूआर कोड लावण्यात येणार आहे.

क्युआर कोडचे फायदे -

१ . प्रत्येक महिला डब्यात क्यूआर कोड लावणार

२. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर महिला डब्यात पोलिस आहे का हे कळेल

३. ड्युटीवर उपस्थित असलेल्या पुरुष आणि महिला पोलिसांचे फोटो आणि संपर्क क्रमांक मिळणार

४ . जर ड्युटीवर पोलीस नसेल तर महिला पुरुष डब्यात बसण्याचे नियोजन करू शकतील

मनुष्यबळाची कमतरता -

सध्यास्थिती लोहमार्ग पोलिसांकडे ४१६३ मजुरी पदांपैकी साधरणतः साडे तीन हजार लोहमार्ग पोलीस कर्तव्यावर हजर असतात. १३९ रेल्वे स्थानक, ३ हजार १०० लोकल सेवा मधून प्रवास करणाऱ्या ८५ लाख प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

याशिवाय प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये किमान तीन महिला डब्बे आहेत, जिथे पोलीस किंवा होमगार्ड तैनात करणे आवश्यक असते. याशिवाय रेल्वे हद्दीत प्रवाशांबाबतीत घडणारे गुन्हे व त्याचा तपास करुन पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे.

मात्र, मनुष्यबळ कमी असल्याने लोहमार्ग पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे 'क्यूआर कोड' लावण्यापेक्षा आगोदर मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक्य असल्याची माहिती एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली आहे.

१५०० होमगार्डची मागणी-

मुंबई लोहमार्ग पोलसांच्या कार्यक्षेत्रात १३९ रेल्वे स्थानके येतात, प्रत्येक स्थानकावर साधरणात ४ ते ८ प्लँटफॉर्म आहे. १३९ रेल्वे स्थानकावरील सुरक्षेकरिता २३०० पोलिसांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे, तसेच होमगार्डची २ हजार पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६०० ते ८०० मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रात्रीच्या सर्व लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यांसाठी किमान दीड हजार होमगार्ड्सची मागणी जीआरपीने केली आहे. होमगार्ड उपलब्ध झाल्यावर क्यूआर कोडचा फायदा महिला प्रवाशांना होणार आहे.

आम्ही महिला डब्यात क्युआर कोड लावण्याची सूचना झालेल्या बैठकीत केली होती. जेणेकरून रात्री महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला त्याच्या मोठा फायदा होईल. त्याला लोहमार्ग पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

- विद्या सरमळकर, सदस्य, रेल्वे दक्षता समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT