वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्याविरोधात 500 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात गुन्हा नोंदवत अटक केली आहे. दरम्यान काल मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. (Senior IRS officer Sachin Sawant arrested by CBI )
ईडीने मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. सचिन सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. दरम्यान सचिन सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. (Latest Marathi News)
सचिन सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. सचिन सावंत सध्या सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
सीबीआयने अधिकाऱ्याविरुद्ध नोंदवलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे हा छापा टाकण्यात आला आहे. सचिन सावंत हे ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी एका बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणाची चौकशी केली होती.(Latest Marathi News)
ईडीने सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर संवर्गात कार्यरत असलेल्या आयआरएस अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सकाळी छापा टाकला. आयआरएस अधिकारी सचिन सावंत भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीचे हा एक भाग होते. (Latest Marathi News)
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सावंत यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेतली आहे. सचिन सावंत यांनी यापूर्वी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम केले होते. यांनी काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे 500 कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. याप्रकरणाची सचिन सावंत यांनी चौकशी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.