singer jagjit kaur sakal media
मुंबई

ज्येष्ठ गायिका जगजीत कौर यांचे निधन

संतोष भिंगार्डे

मुंबई : ज्येष्ठ गायिका (senior singer and composer) तसेच संगीतकार खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर (jagjit kaur death )यांचे आज सकाळी जुहू (juhu) येथील राहत्या घरी निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत (vile parle cemetery) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी भजनसम्राट अनुप जलोटा, संगीतकार उत्तम सिंग (uttam singh) आदी मंडळी उपस्थित होती.

जगजीत कौर यांनी खय्याम यांनी संगीत दिलेली अनेक लोकगीते, शास्त्रीय संगीत आणि गझल गायल्या होत्या. त्यांनी पन्नासच्या दशकात चित्रपटांसाठी गायन सुरू केले आणि त्या १९८० पर्यंत सिने उद्योगाशी संबंधित राहिल्या. पुढे जगजीत कौर स्वत: चित्रपटांपासून दूर राहिल्या. पण खय्याम यांच्या चित्रपटांमध्ये जगजीत कौर त्यांच्यासोबत संगीतावर काम करत असत.

खय्याम यांच्या जीवनप्रवासात त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांची विशेष भूमिका राहिली. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले शगुन चित्रपटातील प्रसिद्ध गीत - तुम अपना रंज़ो ग़म अपनी परेशानी मुझे दे दो हे जगजीत कौरने गायलेल्या अप्रतिम गाण्यांपैकी एक आहे. जगजीत कौर यांनी गायलेली बहुतेक गाणी लोकसंगीतावर आधारित होती जी आजही लोकांच्या आठवणीत आहेत.

'बाजार'मधील 'देख लो हमको जी भरके' किंवा 'उमराव जान'मधील 'काहे को बयाहे बिदेस' ही गाणी त्यांनी गायली. खय्याम यांच्या निधनानंतर त्या मनाने खचल्या होत्या. तेव्हापासून त्या आजारीच होत्या. खामोश ज़िन्दगी को अफसाना मिल गया”(दिल-ए-नादान-1953),पहले तो आँख मिलाना" (शोला और शबनम-1961), "लड़ी  रे लड़ी  तुझसे आंख जो लड़ी"( शोला और शबनम -1961) अशी काही गाणी त्यांनी गायलेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT