मुंबई : वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईत पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे स्वयंपाक; तसेच आंघोळीसाठी वापरलेले पाणी गटारात सोडण्याऐवजी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी पालिकेने गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या आवारात शोषखड्डा तयार करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना या पाण्याचा वापर पिण्याखेरीज इतर अनेक कामांसाठी करता येणे शक्य होणार असून, पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करणे शक्य होणार आहे.
महत्वाचे नाताळच्या सुट्टीत रेल्वेची शिक्षा
स्वयंपाकघर, न्हाणीघर ह्यांमधील सांडपाणी गटारांमधून सोडण्यात येते. या पाण्याचा पुनर्वापर होत नसल्याने पाण्याचा अपव्ययच मोठ्या प्रमाणात होतो. स्वयंपाकघर, न्हाणीघरमधील सांडपाणी गटारात सोडण्याऐवजी शोषखड्ड्यांच्या मदतीने जमिनीत मुरवता येईल आणि त्याच्या माध्यमातून पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी या पाण्याचा वापर करता येईल, या उद्देशाने पालिकेने शोषखड्डा तयार करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.
५०० चौ. मी. व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडाचा विकास किंवा पुनर्विकास करावयाचा असल्यास पर्जन्यजल संचयन व्यवस्था करणे आवश्यक आहे. या पर्जन्यजल संचयनाचे बांधकाम पालिकेच्या मानांकानुसारच करणे आवश्यक आहे. प्रत्येक इमारतीच्या मालक किंवा संस्थांनी शोषखड्डा निर्माण करून त्या पाण्याचा वापर पिण्याशिवाय इतर गोष्टींसाठी किंवा भूजल पातळीच्या संवर्धनासाठी करायचा आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे येणार असून त्यांची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंमलात येईल.
किमान १ मी व्यास आणि किमान ६ मीटर खोली असलेली उघडी विहिर किंवा किमान ०.३ मी व्यास आणि किमान २ मीटर खोली असलेली प्रत्येकी ६ मीटर अंतरावर पर्जन्य वाहिन्यांमध्ये पावसाचे पाणी आतील गाळ व तरंगणारे पदार्थ गाळून बाजूला काढल्यानंतर साठवता येईल. विहिरीरील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त धुणे, फ्लॅशिंग, बागेला पाणी इत्यादी कामांसाठी करावा लागणार आहे. जल संवर्धनासाठी कुपनलिकेद्वारे पर्जन्यजल संचयन केले जाऊ शकते. या कुपणालिकेभोवती एक मीटर रुंद व किमान ३ मी. खोल खड्डा खोदावा व व त्याचे खडी व वाळूने पुनर्भरण करावे.
असा असेल शोषखड्डा
कुपनलिकेचे जलसंवर्धनासाठी गाळलेले पावसाचे पाणी पुनर्भरण केलेल्या खड्ड्यामध्ये सोडावे. भूगर्भशास्त्रीय आणि भौगोलिक परिस्थितीनुसार खड्ड्यांचा आकार १.२० मी रुंद १.२० मी लांब, २.०० मी ते २.५० मी खोल असावा. चरिचा आकार ०.६० मी रुंद, २.०० ते ६.०० मी लांब आणि १.५० ते २.०० मी खोल असू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.