mumbai sakal
मुंबई

2022 पर्यंत सोशल डिस्टस्टिंग पाळा:तिसऱ्या लाटेसाठी टास्क फोर्सचा गंभीर इशारा

डिसेंबर 2022 पुढचे 14 महिने सोशल डिस्टस्टिंग पाळणे आणि मास्क वापरणे बंधनकारक

सकाळी वृत्तसेवा

मुंबई : डिसेंबर (December) 2022 पर्यंत म्हणजेच किमान पुढचे 14 महिने सोशल डिस्टस्टिंग (Social Distancing) पाळणे आणि मास्क (Mask) वापरणे हे सर्वांनाच बंधनकारक असल्याचा इशारा राज्य टास्क फोर्सकडून (State Task Force) देण्यात आहे. तिसऱ्या लाटेच्या (Third wave) पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष देऊन दिलेल्या निर्बंध शिथिलतेचा गैरवापर न करण्याचा सल्ला टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित (Dr.Rahul Pandit) यांनी दिला आहे.

डॉ. राहुल पंडित यांचे डी.वाय. पाटील रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले आहे. तसेच ग्रांट मेडिकल कॉलेज जे.जे रुग्णालयातून एमडीचे शिक्षण पूर्ण केले असून सिडनी ऑस्ट्रेलिया मधून क्रिटिकल केअर मध्ये स्पेशलायझेशन केले असून सध्या ते राज्य कोविड टास्क फोर्स चे सदस्य आहेत.

तिसरी लाट येणार हे नक्की, त्यात कोणताही वाद नसून प्रत्येक लाटेत साधारण 100 ते 120 दिवसांचे अंतर असते असे एकूण निदर्शन आहे. पण, हे अंतर यापुढे किती लांबवता येईल? दोन वर्षात 200 दिवसांपर्यंत ते पोहोचेल का यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. यासाठी चार गोष्टी महत्त्वाच्या भूमिका बजावतील. त्यात मास्क, सोशल डिस्टस्टिंग , सॅनिटायझेशन आणि लसीकरण हे चार ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

तिसरी लाट कधी आणि किती मोठी येईल याचे नेमके स्वरुप कसे असे हे सांगणे आताच कठीण आहे.  पण, जेव्हाही अनलॉक केले जाते, त्यानंतर, किमान पुढील 20 ते 25 दिवस तिसरी लाट येण्याची भीती असते. 15 ऑगस्टला आपण निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे, 15 सप्टेंबरपर्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे. जर तिसरी लाट पुढे ढकलण्यास मदत झाली तर तेवढाच वेळ नागरिकांचे लसीकरण करण्यास मिळणार आहे. आणि त्यातून नागरिकांना आणखी चांगली सुरक्षा मिळेल.

  • 31 डिसेंबर 2022 पर्यंत मास्क वापरावा लागेल -

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्या म्हणण्यानुसार, 31 डिसेंबर 2022 पर्यंत मास्क वापरावाच लागेल. म्हणजेच, पुढील 1 ते दिड वर्ष कोविडचे सर्व निकष हे पाळावेच लागणार आहेत.

  • डेल्टा व्हेरिएंट धोकादायक -

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट हा धोकादायक आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या गुणधर्मात जास्त फरक नाही. त्यामुळे, अख्ख्या जगात डेल्टामुळेच रुग्ण वाढले. स्ट्रेन कोणताही आला तरी मास्किंग आणि लसीकरण केले तर जास्त फायदा होऊ शकेल.

  • 4 ते 5 महिन्यांत होऊ शकते लसीकरण पूर्ण -

लसीकरणाचा वेग आता वाढू लागला आहे. संपूर्ण जगात लस एका फ्लोमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आता 6 लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार, सप्टेंबर अखेरपर्यंत लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. भारतात 80 लाखांपर्यंत लसीकरण केले जाते. त्यामुळे, जर हा वेग असाच राहिला तर पुढच्या 4 ते पाच महिन्यात नागरिकांचा पहिला आणि दुसरा डोस पूर्ण होऊ शकेल असेही डॉ. पंडित यांनी सुचवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT