Sakinaka Crime sakal media
मुंबई

साकिनाका लैगिंक अत्याचार आणि हत्या प्रकरण; ३४६ पानांचे आरोपपत्र सादर

राजु परुळेकर - सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : लैगिंक अत्याचारानंतर (Sexual harassment) एका ३२ वर्षांच्या महिलेला अमानुष मारहाण करुन तिच्या गुप्त भागावर रॉड घुसवून तिची हत्या केल्याप्रकरणी मोहन कतरब चौहाण याच्याविरुद्ध मंगळवारी साकिनाका पोलिसांनी (sakinaka police) दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात (session court) ३४६ पानांचे आरोपपत्र (charge sheet) सादर केले आहे. त्यात ७७ जणांचे जबानी नोंदविण्यात आली असून आरोपपत्रात आरोपीविरुद्ध वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व प्रकारे भक्कम पुरावे सादर करण्यात आले आहे.

अवघ्या अठरा दिवसांत पोलिसांनी तपास पूर्ण करुन आरोपपत्र सादर केले आहे. साकिनाका येथे राहणार्‍या एका ३२ वर्षांची महिलेवर मोहनने लैगिंक अत्याचार केला होता. तिला अमानुष मारहाण करुन तिच्या गुप्तभागावर तिक्ष्ण हत्याराने दुखापत केली होती. त्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी हत्येचा कलम वाढविला होता. याच गुन्ह्यांत नंतर ऍट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत मोहन चौहाणला पोलिसांनी अटक केली होती. तो उत्तर प्रदेशला पळून जाण्याचा तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती. बारा दिवस तो पोलीस कोठडीत होता. २३ सप्टेंरबला त्याला पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. सध्या तो आर्थर रोड कारागृहातील विशेष बॅरकमध्ये आहे. मंगळवारी साकिनाका पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन त्याच्याविरुद्ध दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले.

३४६ पानाच्या या आरोपपत्रात पोलिसांनी ७७ साक्षीदारांची जबानी नोंदवून घेतली आहे. तसेच आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर केले आहे. आरोपी मोहन चौहाणविरुद्ध ३०२, ३७६, २३२, ५०४, ३४, भादवी सहकलम ३ (१), (डब्ल्यू), ३ (२), (अ) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ अन्वये कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालणार असून लवकरच या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT