Shahad Bridge esakal
मुंबई

Shahad Bridge : खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांच्या विळख्यातून शहाड ब्रिजचा मोकळा श्वास

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : महानगरपालिकेने रस्त्यांवरील हातगाड्यांवर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमे अंतर्गत शहाड ब्रिजच्या खालील सर्व खाद्य पदार्थांच्या हातगाड्या हटवण्यात आल्याने गाड्यांच्या विळख्यातून ब्रिजने मोकळा श्वास घेतला आहे.

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी गणेश शिंपी,सहायक आयुक्त मनिष हिवरे यांनी गोल मैदान ते मधुबन चौक,मोहटा देवी रोड भंगार गल्ली परिसरातील भंगार वाले,गॅरेज वाले,सी ब्लॉक रोड व शहाड ब्रिज खाली उभ्या असलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या यांच्यावर कारवाई केली आहे.यावेळी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रस्त्यांवर उभ्या करण्यात येणाऱ्या विविध वस्तू विक्रीच्या हातगाड्या उभ्या करण्यात येत असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून वादविवादाच्या घटना घडत आहेत.त्यामुळे आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्या आदेशानुसार अशा हातगाड्यांवर कारवाई करण्याची आणि दंड वसुलण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून ती अविरत राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर गवस,नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT