Sharad Pawar News | Rajya Sabha Election Updated esakal
मुंबई

पवारांनी ऐनवेळी मतांचा कोटा बदलला, रात्रीतून 'मविआ'ची समीकरणं फिरली

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. सध्या मविआ आणि भाजपचे सर्व आमदार विविध ठिकाणी रिसॉर्ट्सवर दाखल झाले आहेत. एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत आहेत. (Sharad Pawar Changed Voting quota for Rajyasabha Election 2022)

हॉटेल्सवरून मतदानासाठी विधानभवनाकडे बसेस दाखल झाल्या आहेत. पक्षांचे आमदार आणि मंत्री यांनी सोबत विधानभवनात एन्ट्री घेतलीय. मात्र, शरद पवार यांनी रात्रीतून सूत्र फिरवत वेगळीच खेळी केलीय. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांचा कोटा बदलल्याची माहिती समोर येत आहे. (Rajyasabha Election 2022)

राष्ट्रवादीची 42 मतांचा कोटा पवारांना अचानक 44 चा केला आहे. यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केलीय. सेनेचे नेते रात्रीतून पवारांच्या भेटीला गेले. अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंतांनी शरद पवारांची भेट घेतली.

प्रफुल्ल पटेल यांचा कोटा वाढवल्याने आता मविआच्या चौथ्या जागेसाठीची मतांची जुळवाजुळव करताना दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारल्यानंतर त्यांनी हे भाजपचं षडयंत्र असल्याचं म्हटलंय. त्यांनी बातम्या पेरल्या आहेत, असं ते म्हणाले. पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.

प्रफुल्ल पटेलांसाठी पवारांची खेळी

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठीच मतांचा कोटा ऐनवेओळी बदलण्या आला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली होती.

विशेष न्यायालयाने त्यांना मतदानास नकार दिल्यानंतर आता समीकरणं बदलली आहेत.त्यामुळे पवारांनी तातडीने निर्णय घेतला. राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदावाराला एकूण 42 मतं लागणार आहेत. 42 मतांचा कोटा ठरलेला असताना, राष्ट्रवादीनो तो 44 केल्याचं कळतंय.

राष्ट्रवादीचे आमदार विभागले

अन्य सर्व पक्षांचे आमदार एकाच हॉटेलवर आहेत. मात्र, राष्ट्रवादीने वेगळा पॅटर्न राबवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये विभागून ठेवलं आहे. सेंट रेजिस या हॉटेलमध्ये काही मोजकेच आमदार आहेत. या ठिकाणीचे आमदार आपल्या गाड्यांमधून विधान भवनात जात आहेत. त्यांच्यासाठी बस करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT