मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share Market) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. परिणामी गुरूवारीदेखील शेअर बाजाराच्या (Share Bazar) निर्देशंकांमध्ये (Points) घसरण दिसून आली. नफावसुलीमुळे आजही भारतीय निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी घसरला. त्यामुळे निफ्टी पंधरा हजारांखाली घसरला. तर सेन्सेक्सही ५० हजारांच्या आत बंद झाला. (Share Market Down Sensex closes below 50,000 Nifty closes under 15,000)
आज 337 अंशांनी घसरलेला सेन्सेक्स 49,564 अंशांवर स्थिरावला तर 124 अंश घसरलेला निफ्टी 14,906 अंशांवर बंद झाला. आज ओएनजीसी, सनफार्मा, पॉवरग्रीड या समभागांचे दर दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. तर भारती एअरटेल आणि कोटक, एचडीएफसी व अॅक्सिस या बँकांच्या समभागांचे दर एक टक्क्यापेक्षा जास्त कमी झाले. महिंद्रा आणि महिंद्रा (बंद भाव 804 रु.) दोन टक्के वाढला, तर इंडसइंड बँक, लार्सन टुब्रो, इन्फोसिस हे समभाग किरकोळ वाढले.
आजचे सोन्याचांदीचे दर
24 कॅरेट सोने (10 ग्रॅम)- 47,000 रुपये
चांदी (1 किलो)- 72,300 रुपये
(संपादन- विराज भागवत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.