मुंबई : गांजाला (hashsih) हर्बल तंबाखू (herbal tobacco) म्हणणारे सरकार (government) महानगरांमधील अग्नीसुरक्षा नियमांकडे (Fire protection rules) दुर्लक्ष करून सर्वसामान्यांना आगीतून फुफाट्यात लोटण्याखेरीज दुसरे काहीही करू शकत नाही, अशी जळजळीत टीका मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (sheetal Gambhir desai) यांनी केली आहे.
वन अविघ्न इमारतीत अग्नीकांड होऊन नागरिकांवर मोठे विघ्न आल्यानंतर आता जागी झालेली महापालिका अग्नीविषयक नियमांचे पालन होते का हे पाहणार आहे. हे कृत्य म्हणजे आग लागल्यावर विहीर खणण्याचाच प्रकार आहे. म्हणजे इतकी वर्षे महापालिकेने याबाबत काहीच केले नाही, हेच यातून उघड होते, अशी टीकाही श्रीमती देसाई यांनी केली.
शहरात बेबंद बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन देणे, अवैध फेरीवाल्यांना रस्ते आंदण देणे, मोक्याच्या जमिनीवर झोपडीवासियांना पथारी पसरू देणे, नाले-रस्ते बांधताना भ्रष्टाचार करणे, पावसाळ्यात मुंबई तुंबवून ठेवणे, हे महापालिकेचे कर्तृत्व गेली पंचवीस वर्षे मुंबईकरांना चांगलेच ठाऊक झाले आहे. पंचवीस वर्षे महापालिकेचा कारभार पाहणाऱ्या शिवसेनेने शहरासाठी काय केले, याचा जाब आता मतपेटीतून विचारण्याची वेळ आली आहे, असेही त्या म्हणाल्या.
मुंबईत गगनचुंबी इमारती उभारण्याची परवानगी देणाऱ्या मुंबई महापालिकेकडे त्यासंदर्भात पायाभूत सुविधा नाहीत हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अशाच काही गगनचुंबी इमारतींच्या आगीप्रसंगी शेजारच्या चिंचोळ्या गल्ल्यांमुळे बंब तेथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तर परवाच्या आगीत उंचावर पाण्याचे फवारे मारण्यातही बंब अपयशी ठरले. हे नसले तरीही इमारतींमध्ये स्वतःची आपातकालीन तात्पुरती अग्नीशामन यंत्रणा असायलाच हवी. ती आहे का यावर नियमित देखरेख करण्याचे कामही महापालिका करू शकत नाही. किंवा अशी यंत्रणा नसतानाही साटेलोटे करून याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जाते.
आता जागी झालेली महापालिका अग्निशामक यंत्रणा आहे का याची तपासणी करणार आहे. हा अकार्यक्षमतेचा उच्च कोटीचा नमुना असून या हलगर्जीपणाबद्दल महापौरांनी राजीनामा द्यायला हवा, अशी टीकाही देसाई यांनी केली. स्वतः पूर्वी वैद्यकीय क्षेत्रात सेवा केली असूनही शहरातील आरोग्ययंत्रणा सुधारण्यात, त्यातील तृटी दाखवून देण्यात महापौर किशोरी पेडणेकर कोरोना काळात सपशेल अपयशी ठरल्या होत्या. आता साधे अग्निशामक नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने त्यांचे अपयश पुन्हा एकदा समोर आले आहे, अशी टीकाही देसाई यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.