मुंबई: सध्या सुरु असलेल्या पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणाच्या चौकशीत आपल्यालाही अटक होऊ शकते, अशी भीती अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या (Sherlyn Chopra) मनात आहे. त्यासाठी तिने अटकपूर्व जामिनासाठी (anticipatory bail) कोर्टात अर्ज केला होता. पण मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai session court) तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्राशी संबंधित हे प्रकरण आहे. (Sherlyn Chopras anticipatory bail plea rejected in pornography case related to Raj Kundra dmp82)
राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई गुन्हे विभागाच्या संपत्ती शाखेकडे शर्लिनने आपली जबानी नोंदवली आहे. तिने एप्रिल २०२१ मध्ये राज कुंद्राविरोधात लैंगिक जबरदस्ती केल्याचा आरोप केला होता. तिने त्याच्याविरोधात एफआयआरही नोंदवला होता.
२०१९ च्या सुरुवातीला आमच्यात बिझनेस मीटिंग झाली. त्यानंतर २७ मार्च २०१९ रोजी राज कुंद्रा अचानक तिच्या घरी येऊन धडकला. एका टेक्स मेसेजवरुन त्यांच्यात वाद झाला होता. राज कुंद्राने जबरदस्ती माझं चुंबन घेण्यास सुरुवात केली. मी त्याला विरोध करत होते. मला विवाहित पुरुषामध्ये अडकायचे नाही, हे मी राजला स्पष्टपणे सांगितले. त्यावर राजने पत्नी शिल्पा शेट्टीसोबत आपले संबंध बिघडल्याचे उत्तर दिले. शर्लिनने तिच्या तक्रारीत हे सर्व नमूद केले आहे.
राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी १९ जुलैला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी राज कुंद्राच्या जुहू येथील बंगल्यावर छापा मारला. शिल्पा शेट्टीचीही पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तिने आपला नवरा पॉर्न कंटेट निर्मितीमध्ये सहभागी नसल्याचे सांगितले. पॉर्न आणि कामुक साहित्यामध्ये फरक असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. राज कुंद्रावर पॉर्नची निर्मिती आणि वितरणाचा आरोप आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.