Durgadi Devi Temple Kalyan esakal
मुंबई

Durgadi Fort : शिंदे-ठाकरे गटाचे दुर्गाडी देवीच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन; किल्ल्याजवळ तणावाचं वातावरण, काय आहे कारण?

राज्यभरात हिंदू धर्मीय आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) व मुस्लिम बांधवांकडून ईद उत्सव साजरा केला जात आहे.

शर्मिला वाळुंज

बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेश बंदी आणि घंटानाद करु दिला जात नाही. हे आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने सुरु झाले आहे.

डोंबिवली : राज्यभरात हिंदू धर्मीय आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) व मुस्लिम बांधवांकडून ईद उत्सव साजरा केला जात आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ (Durgadi Fort) मात्र काहीसे तणावाचे वातावरण पहायला मिळाले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही शिवसेनेकडून दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिंदे व ठाकरे गटात विभागली गेली असली तरी गेल्या 38 वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनासाठी दोन्ही गट एकत्र आल्याचे दिसून आले.

आंदोलनादरम्यान काही शिवसैनिकांनी बॅरिकेट्स ओलांडून किल्ल्यात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले. दुर्गाडी किल्ल्यावर देवीचे मंदिर आहे, तसेच त्याच परिसरात एक छोटी मशिदही आहे. त्या ठिकाणी मुस्लिम समुदाय बकरी ईदच्या (Bakari Eid) निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी येत असतो. त्या काळात हिंदू बांधवांना देवीचे दर्शन आणि पूजा ही काही काळासाठी बंद ठेवण्यात येते. याचा निषेध म्हणून स्व.आनंद दिघेंनी घंटानाद आंदोलन सुरु केले होते आणि आताही दरवर्षी हे आंदोलन केले जाते.

बकरी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना दुर्गादेवीच्या दर्शनास प्रतिबंध केला जातो. त्याच्या निषेधार्थ तसेच हिंदूंनाही देवीच्या दर्शनास प्रवेश दिला जावा, या मागणीसाठी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली 1986 पासून दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानात आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, शिवसेनेत फूट झाल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून हे आंदोनल केले जाते.

सोमवारी सकाळी बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केली. यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थिती होते. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दुर्गाडी किल्ला परिसरात घंटानाद आंदोलन केले. टिळक चौकातून घंटानाद करत शेकडो कार्यकर्ते दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने आले आणि आंदोलन केले. दरम्यान, दुसरीकडे लालचौकी परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.

Durgadi Devi Temple Kalyan

पोलिसांनी या दोन्ही गटांना वेगवेगळ्या वेळा ठरवून देण्यात आल्या, आधी शिवसेना शिंदे गट आंदोलनासाठी आले तर त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी आले. मात्र लालचौकी येथे यावेळी ठाकरे गट व शिंदे गट आमने-सामने आल्याचे दिसून आले, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाला बाजूला केले. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात घेतले आणि नतर त्यांना सोडून देण्यात आले.

आंदोलकाचं म्हणणं काय?

बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेश बंदी आणि घंटानाद करु दिला जात नाही. हे आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने सुरु झाले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी बंदीहुकूम मोडून देवीचे दर्शन घेतले होते. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार. कोणत्याही दिवशी देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी असता कामा नये. देवीचे दर्शन घेणे हा हिंदूंचा हक्क आहे, असे आंदोलकांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT