मुंबई

Shinde Vs Bjp : शिवसेना शिंदे गट आणि भाजप समर्थक भिडले, पक्षाचे चिन्ह रेखाटताना झाला वाद

Shinde Vs Bjp शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप

शर्मिला वाळुंज

Shinde Vs Bjp : भारतीय जनता पार्टीचे चिन्ह भिंतीवर रेखाटत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या समर्थकांनी विरोध करत बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचा आरोप भाजप समर्थकांनी केला आहे. यामुळे कल्याण पूर्वेत आजही शिंदे व भाजप मध्ये आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.

आपल्या माजी नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा मोरे यांनी दिला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

राज्यात शिंदे व फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावर सारे काही सुरळीत सुरु असताना तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते. भाजप पदाधिकाऱ्यांची शिंदे गटाकडून अडवणूक होत असल्याने भाजप नेते, पदाधिकारी नाराज होते.

कल्याण लोकसभा मतदार संघात देखील भाजप आणि शिंदे गटातील वाद अनेक घटनांमधून समोर आला आहे. भाजप नेत्यांनी यापूर्वी देखील अनेक कार्यक्रमांत उघड उघड शिंदे गटास सहकार्य तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांची समजूत काढण्यास सांगण्यात येत होते. परंतू त्यास शिंदे गट फारसा प्रतिसाद देताना दिसत नाही.

कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतः ग्रामीण भागातील एका कार्यक्रम प्रसंगी मंचावर शिंदे गटाचे खासदार शिंदे यांच्याकडे ही खंत बोलून दाखवली होती. त्यानंतरही कल्याण पूर्वेत भाजप व शिंदे गटात कुरबुरी या सुरुच आहेत.

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील टेकडी परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजप पक्षाचे चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान शिंदे गटाचे माजी नगरसेवकाचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध करत तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

शिवसेना नगरसेवक यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे.यावेळी भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिलाय.भाजप शहर अध्यक्षसह कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेत. घडल्या प्रकाराबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT