uddhav thackeray  uddhav thackeray
मुंबई

शिवसेना वर्धापन दिन : CM ठाकरेंनी 'या' पाच प्रमुख मुद्द्यांवर केलं भाषण

शिवसेनेचा आज ५६वा वर्धापन दिन असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा यंदा साध्या पाद्धतीनं साजरा झाला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचा आज ५६वा वर्धापन दिन असून हॉटेल वेस्टइन इंथ हा सोहळा पार पडला. वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हॉटेलमधील आमदारांशी प्रत्यक्ष तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर विविध मुद्द्यांवरुन टीका केली. त्यांच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे असे. (Shiv Sena Anniversary CM Thackeray delivered a speech on five major issues)

१) शिवसेनेच्या जुन्या आठवणींना उजाळा : शिवाजी पार्कमधील आमचं वन बीएचके घरात माझे आजोबा, वडील, काका त्यांचं कुटुंब राहत होतं. त्यानंतर शिवसेनेची स्थापना झाली, याचे साक्षीदार आमच्या कुटुंबातील एक दोन लोकचं असतील. मी त्यावेळी ६ वर्षांचा होतो. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पक्ष स्थापनेचा नारळ फुटला होता. कालांतरानं शिवसेनेनं माझ्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी दिली. या ५६ वर्षांच्या वाटचालीत अनेक ज्ञात-अज्ञात शिवसैनिकांनी घाम गाळला, वार अंगावरही घेतले. काही आपल्यात आहेत काही निघून गेले सर्वांना माझं विनम्र अभिवादन. त्यावेळी त्यांनी ते केलं नसतं तर आजचं वैभव पाहू शकलो नसतो. त्या पिढीतले पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे साथी सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी मोठी साथ दिली. नव्या दमाचे सळसळते सैनिकही नव्याने सेनेत येत आहेत.

२) विधानपरिषद निवडणूक : हॉटेलमध्ये आपल्याच आमदारांना ठेवणं ही आजची लोकशाही आहे. पण आजचं चित्र दिसतंय उद्या निवडणुकीनंतर चांगल्या पद्धतीनं दिसलं पाहिजे. एखादा चांगला कार्यकर्ता गेला तर तो खूप मोठा फटका असतो. आज वेगळ्या पद्धतीनं वर्धापन दिन साजरा करायचं ठरवलं. उद्याच्या निवडणुकीची मला चिंता नाही. कारण जर मी चिंता करत बसलो तर शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणुकीचं काय? राज्यसभेत आमचं एकही मत फुटलेलं नाही. पण कोणाचं मत फुटलं याचा अंदाज लागलेला आहे. हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल. त्यामुळं मला उद्याच्या फाटाफुटीची शक्यता वाटतं नाही. शिवसेनेत गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाही.

३) हिंदुत्व : ज्यावेळी कोणी हिंदुत्वाचा उच्चार करायला तयार नव्हंत, तेव्हा हिंदुत्वाचा नारा बुलंद केला तो केवळ शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेनं केला. आजचं जे हिंदुत्व चाललंय ते त्यांच्यासाठी असेल माझ्यासाठी नाही. लोकांचा कोणताही विचार न करता जर तुम्ही सरकार चालवत असाल तर राज्य करायला तुम्ही नालायक आहात.

४) अग्निपथ योजना : सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात तरुण आज रस्त्यावर उतरलेले आहेत. कोणी भडकवली त्यांची माथी? हृदयात राम आणि हाताला काम तेच चित्र आज दिसतंय. हातात काम नसेल तर नुसतं राम राम म्हणून उपयोग नाही. कालपरवा मोदी देहूला येऊन गेले वारकऱ्यांसाठी आपणही मदत करत आहोत. पण ते एकतर्फी बोलून चालणार नाही. नोटाबंदी, शेतकरी कायदे आले यावर पहिल्यांदा शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आवाज उठवला. नाईलाजानं सरकारला पाऊल मागे घ्यावं लागलं. वचनं अशी द्यावीत जी टिकून राहिली पाहिजेत. शिवसेनेनं जी वचनं दिली ती पूर्ण केली. अग्निवीर म्हणजे काय तर त्यांना सुतारकाम, गाडी चालवायला शिकवणार, चार वर्षांनंतर त्यांच्या नोकरीचा पत्ता नसेल. नुसती मोठ्या नावाच्या योजना कशाला आणायच्या? भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? उद्या भाडोत्री राज्यकर्ते पण आपण आणू उद्या टेंडरही काढा मग मुख्यमंत्री पाहिजे, पंतप्रधान पाहिजे.

५) भाजपवर टीका : सत्तेपुढं शहाणपण चालणार नाही. जर हे चालणार नसले तर शहाणं व्हायचं तरी कशाला. जा सगळे जण भाजपमध्ये जा. प्रत्येकाला पर्याय असतो. पण शेराला सव्वाशेर असतोच त्यामुळं प्रत्येकानं हे लक्षात ठेवायला पाहिजे की, आज तुम्ही शेर आहात उद्या सव्वाशेर असेलच. सध्याचं राजकारण हे पावशेरचं राजकारण आहे. कारण तेवढ्या पुरती वेळ मारुन न्यायची. त्यामुळं देशात पेटापेटी सुरु असली तरी महाराष्ट्र पेटत नाही. पण जेव्हा महाराष्ट्र पेटतो तेव्हा तो समोरच्या जळून खाक केल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राच पेटणं हे वेगळं असतं. शिवरायांच्या काळातही महाराष्ट्रानं ऐतिहासिक काम केलं आहे. आजही तीच परंपरा आपण घेऊन चाललो आहोत. राज्यसभेत दुर्देवानं आपला पराभव झाला पण एक चांगला संजय पवार आपल्यामध्ये खासदार असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT