Lok Sabha 2024 esakal
मुंबई

Lok Sabha 2024: कल्याणची जागा शिवसेनेच्या वाट्याला? खासदार श्रीकांत शिंदेंचा दावा; पण भाजप म्हणतंय...

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी पक्ष मजबुतीच्या दृष्टीने बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातुन भाजपा दावा ठोकणार का? याविषयीच्या चर्चा रंगत असताना शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र आणि राज्याच्या नेतृत्वाने हे स्पष्ट केले आहे की जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे शिवसेनेचे उमेदवार जागा लढवणार.

माझ्या मनात काही संभ्रम नाही तसेच भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे चांगले मित्र आहेत असे सांगितले. शिंदे यांचे मित्र केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मात्र मित्राला सल्ला देताना सांगितले हे तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही.

पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील, ती वेळ 2024 मध्ये येईल. मंत्री ठाकूर यांच्या या सल्ल्यामुळे कल्याण लोकसभेची जागा पुन्हा एकदा चर्चेत आली असून भाजपा या जागेवर उमेदवार देऊ शकतो हे नाकारता येत नाही.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपाने येथे मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबुती करणासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी उल्हासनगरच्या दौऱ्यावर आले होते. यापूर्वी त्यांनी दोनदा कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा केला आहे.

भाजपच्या या मोर्चेबांधणी मुळे कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपा दावा ठोकणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गट व भाजपची युती असल्याने या मतदारसंघावर भाजपने दावा दाखविल्यास सध्याचे

विद्यमान खासदार डॉ. शिंदे हे ठाण्यातून निवडणूक लढवून भाजपला ही जागा देण्याची शक्यता आहे. सध्या ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून आपल्या मतदार संघातील विकास कामांवर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे कल्याण मतदार संघावरील दावा ते सहजासहजी सोडणार नाहीत असेच सध्या दिसून येत आहे.

भाजप मधून या जागेवर डोंबिवली विद्यमान आमदार आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांना उमेदवाऱी दिली जाऊ शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. या मतदारसंघावर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी कल्याण ग्रामीण मध्ये लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला

यावेळी ते म्हणाले, लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले, त्याचं नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे सुरू आहेत ते केंद्राकडून देण्यात आले आहेत. त्यापासून आम्हाला काही त्रास नाही.

प्रत्येक पक्षाला आपला पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधतेय. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे मित्र आहेत. ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे स्पष्टीकरण दिले.

यावरच भाजप कडून सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की हे तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. ती वेळ 2024 मध्ये येईल, आत्ता ती वेळ नाही. जर आम्ही सगळी कामं आणि विकास एकत्र करत आहोत. तर हा निर्णय सुद्धा एकत्र बसून घेतला जाईल असे सांगितले.

शिवसेनेचा ठोक दावा आणि भाजपाचे वेळेचे सूतोवाच यावरून कल्याण लोकसभा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

कोण असू शकतात कल्याण लोकसभेसाठी उमेदवार...

शिवसेना (शिंदे गट ) - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

भाजप - कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण

महाविकास आघाडी - माजी आमदार सुभाष भोईर किंवा माजी खासदार आनंद परांजपे

मनसे - आमदार राजू पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT