Thane News : शिवसेना व भाजप एकमेकांच्या हातात हात घालून राज्याच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये मतदार संघावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहे.
अशातच ठाण्यातील घोडबंदर भागात एका कंटेनरमध्ये पालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे शाखा उभारण्यात आली असल्याचा आरोप करीत त्या कंटेनरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने ठाणे पालिका आयुक्तांकडे केली.
तर, दुसरीकडे कंटेनरमध्ये उभारलेली शाखा ही जर महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर असेल तर ती दुसºया जागेवर हलविली जाईल अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच कंटनेर शाखा ही अनाधिकृत बांधकामाचा भाग होऊ शकत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
त्यामुळे कंटेनर शाखेवरून भाजप शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणे महापलिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून, विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानानात्र पत्रकारांशी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांधला.
यावेळी त्यांना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी घोडबंदर मार्गावरील धर्मवीर नगर येथील पालिकेच्या आरक्षित भुखंडावर कंटेनर शाखा उभारल्यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर बुधवारी सरनाईक यांना या संदर्भात विचारले असता, शाखेतून सर्वसामान्यांची कामे होत असल्याने कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे.
परंतु ती जर महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर असेल तर ती तेथून हलविण्यात येईल असे स्पष्ट केले. वास्तविक पाहता ही शाखा माझ्या मतदार संघात नसून ती केळकर यांच्याच मतदार संघात आहे. त्यातही या शाखेमुळे आरक्षणाचा विकास रखडत असेल तर शाखा इतरत्र हलविण्याच्या सुचना शिवसैनिकांना दिल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.
एखाद्या जागेत अनाधिकृत बांधकाम होण्यापेक्षा कंटनेर शाखा उभी राहत असेल आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा केली जात असले तर त्यात चुकीचे असे काही नाही. परंतु या विषयाचा गाजावाजा करायची गरज नव्हती असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे केळकर यांना लगावला.
दरम्यान, हा भुखंड बालउद्यान, पोलीस ठाणे तसेच ओपन जीमसाठी आरक्षीत आहे. या भुखंडावर २०२०-२१ साली केळकर यांच्या प्रयत्नाने संरक्षक पत्रे लावण्यात आले. तसेच या भुखंडावर अतिक्रमण करणाºयांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला.
असे असतानाही सर्व्हेक्षण सुरू होताच २४ जानेवारीला या ठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवण्यात आला. त्यानंतर त्यावर ध्वज चढवत, फोटो लावत या कंटेनरचे रुपांतर शाखेत करण्यात आले. त्यामुळे ही शाखा हटवून भुखंड ताब्यात घ्यावा अशी मागणी केळकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली.
घोडबंदरचा पाणी प्रश्न मागील काही दिवसापासून चांगलाच गाजत आहे. घोडबंदरला १० दशलक्ष लीटर पाणी वाढवून देण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परंतु केवळ पाच एमएलडी पाणी हे पुरेसे नसून घोडबंदरला १०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार सुर्या धरणातून ठाण्याला १०० दशलक्ष लीटर पाणी मिळाले तर भविष्यातील पाण्याची तहान भागविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.