मुंबई

ShivSena MLA Disqualification: "सुप्रीम कोर्टात दिलेली कागदपत्रं सादर करा"; शिवसेनेच्या दोन्ही गटांना नार्वेकरांचे आदेश

शिवसेनेच्या आमदार अपात्रप्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रप्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी उबाठा आणि शिंदे या दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जी कागदपत्रे सादर केली आहेत, तीच कागदपत्रे आमच्यासमोर सादर करावीत असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. (Shiv Sena MLA Disqualification Submit documents filed in Supreme Court Rahul Narvekar orders to both factions)

26 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

सुनावणीदरम्यान, २५ ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटांच्या आमदारांना वेळ देण्यात आला. तसेच पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आलं. यावेळी सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेणार असल्याचं ठरलं. (Latest Marathi News)

सुप्रीम कोर्टातील कागदपत्रे सादर करा

सुनावणीदरम्यान, शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्रं ग्राह धरण्यात यावी अशी मागणी केली, ती मागणी अध्यक्षांनी मान्य केली. यावेळी दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जी कागदपत्रे सादर केली ती माझ्यासमोर सादर करा असे निर्देशही दिले. (Latest Marathi News)

३४ याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार

सुनावणीदरम्यान, ठाकरे गटानं शिवसेनेच्या आमदारांना जो व्हिप ईमेलद्वारे बजावला तो आम्हाला मिळालेला नाही असं शिंदे गटानं सांगितलं. दरम्यान, ३४ वेगवेगळ्या याचिका एकत्र केल्या जाणार आहेत. या सर्व याचिका ६ याचिकेतच मांडल्या जाणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

'या' असणार सहा याचिका

१. पहिल्या मिटींग हजर राहिले नाही

२. दुसऱ्या मिटींगला उपस्थितीत नव्हते

३. स्पीकरविरोधात मतदान करणे

४. बहुमत चाचणीमध्ये व्हीप विरोधात मतदान

५. भरत गोगावले यांचा व्हीप मोडला याची याचिका

६. अपक्ष आमदार गट याचिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT