शिवसैनिकांनी पक्षाचे नेते अनिल देसाई यांची भेट घेतली. 
मुंबई

रायगडला पालकमंत्री शिवसेनेचाच हवा

सकाळ वृत्तसेवा

श्रीवर्धन (बातमीदार) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्‍यानंतर मंत्री वाटपात महाआघाडीच्या सर्वच नेत्यांची खातेवाटपावरून नाराजी झाली आहे. या वेळी श्रीवर्धनमध्ये शिवसैनिक आक्रमक होत रायगडचा मंत्री हा शिवसेनेचाच झाला पाहिजे, यावर आग्रही भूमिका मांडली आहे.

जिल्ह्यात सर्वांत जास्त ज्या पक्षाचे आमदार त्याचाच पालकमंत्री असे गणित मांडलेल्या मंत्रिमंडळ आणि पालकमंत्री वाटपात रायगड जिल्हा मात्र अपवाद ठरला. रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विराजमान झाल्या. रायगड जिल्ह्यात या आधी कधी नव्हे ते शिवसेनेचे तीन आमदार भरघोस मतांनी विजयी झाले. यात महाडचे आमदार भरत गोगावले यांची सलग तिसरी टर्म, तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची पहिली टर्म असल्याने अनुभवानुसार आमदार गोगावले पालकमंत्री होतील, असेच चित्र होते. वास्तविक पाहता, रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्रिपद मिळणे खऱ्या अर्थाने पक्षाला आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना गरज होती. त्यामुळे शिवरायांच्या रायगडात पक्षाला ताकद मिळाली असती. पक्षांसोबत एकनिष्ठ असलेल्या गावांची विकासकामे झाले असती. पदाधिकाऱ्यांना ऊर्जा आणि निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये जोश संचारला असता. पक्षवाढीसाठी पालकत्वाची जबाबदारी घेणारा चेहरा मिळाला असता; परंतु तसे न झाल्याने शिवसैनिकांचा हिरमोड झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

महाड, कर्जत, अलिबाग या वेळी सेनेचे आमदार आहेत. यात गोगावले वगळता थोरवे व दळवी पहिल्यांदाच आमदार झाल्याने पक्षवाढीसाठी त्यांना झटावे लागणार आहे. तर श्रीवर्धन, पेण मतदारसंघात पक्षाची ताकद आहे; परंतु जिल्ह्यात फक्त एकाच जागेवर निवडून आलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्रिपद दिल्याने आपणच राष्ट्रवादीला ताकद देत आहोत. याने भविष्यात शिवसेनेचा खासदार निवडून कसा येणार? असा संतप्त सवाल पदाधिकारीही करत आहेत. महाड येथे आमदार गोगावले यांच्या निवासस्थानी झालेल्‍या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे एकमताने ठरवले. त्‍यासाठी अनिल देसाई यांची भेटही घेण्‍यात आली. त्‍या वेळी जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचाच असायला हवा, अशी आग्रही भूमिका 
शिवसैनिकांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT