मुंबई

मोठी बातमी - विनायक मेटे यांचा राजीनामा

सकाळवृत्तसेवा

शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छा व्यक्त करत शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीचा राजीनामा दिला आहे.  २०१५ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांची छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.  

महाराष्ट्रात आता सत्तापालट झालाय. अशात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. या पार्श्वभूमीवर, " उद्धवजी आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकास कामे होणं अपेक्षित आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुध्दा आपल्या विचारानुसार व्हावे म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. कृपया आपण राजीनामा स्वीकारावा", असं पत्र विनायक मेटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्त केलंय. "आपल्या नेतृत्वाखाली महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होवो, भविष्यामध्ये लागल्यास माझे सहकार्य सदैव राहील", असंही मेटे यांनी पत्रात नमूद केलंय.  

दरम्यान विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकार शिवस्मारकाबद्दल कोणत्याच बैठका बोलावत नसल्याने नाराज होत राजीनामा दिल्याच्या देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. 

shivsangram leader vinayak mete resigned from the post of president of shivsmarak coordination committee 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: “पत्रकारांना मालकाचं ऐकावंच लागतं, एक प्रकारे ते गुलामच आहेत”; राहुल गांधींच्या विधानानं वादंग

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT