LIVE Marathi News Updates 
मुंबई

Uddhav Thacekray : अवली, लवली अन् जनता ‘कावली’; हास्यजत्रेतला डायलॉग मारत उद्धव ठाकरेंचे फटकारे

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेचा ५७वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी अवली, लवली आणि कावली असा शब्द प्रयोग करत हास्यजत्रेचा डायलॉग मारत राजकीय फटकारे मारले. (ShivSena 57th Anniversary Uddhav Thacekray spoke Hasya Jatra dialogue Avli Lovely and Kavali)

ठाकरे म्हणाले, कोविडची लस मोदींनी तयार केली असं फडणवीस म्हणाले, मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का? हे असे सगळे अंधभक्त म्हटल्यानंतर आणि त्यांचे गुरु म्हटल्यानंतर यांना कोणती लस द्यायची हे ठरवावं लागेल. सगळ्यांना मानसिक रुग्णांना समीर चौगुलेंच्या रुग्णालयात पाठवलं पाहिजे. भाजपत सगळे अवली आहेत लवली कोणी नाही. पण त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही अवली असला तरी आता जनता कावली आहे. तुम्ही आमची झोप उडवली सगळचं पळवली. अशा सर्व वातावरणात आपण पुढे जात आहोत.

दरवेळी ते आपल्यावर टीकेचा प्रहार करतात की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं कारण आपण काँग्रेससोबत गेलो. मग मी आठवत बसलो होतो की काँग्रेसचा जमाना होता तेव्हा शिवसेना-भाजप युती होती. काँग्रेसची राजवट होती तेव्हा नरसिंह राव, राजीव गांधी पंतप्रधान असतील तेव्हा घोषणा असायच्या इस्लाम खतरें मे है. आता हे दहा वर्षे तिथं बसले आहेत मग आता हे घोषणा काय देतात तर हिंदू खतरे में है. मग हिंदुत्ववादी कोण काँग्रेस की भाजप?

आता हे अंतराळ गुरु झाले आहेत विश्वगुरुंचे विश्वगुरु झालेत. मला काहीवेळा राहुल गांधींचं आवडतं की, ते म्हणतात जर ब्रह्मदेव यांच्या बाजुला बसले तर ते सांगितील ब्रह्मांड कसं चालवायचं. हे मला पटतं कारण लस त्यांनी बनवलं असेल तर ते नक्कीचं ब्रह्मांड चालवत असतील अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: मोदींच्या शिक्षणासंबंधी टिपण्णी; केजरीवालांविरोधातील समन्स रद्द करण्यास कोर्टाचा नकार

IND vs UAE : Rasikh Salam ने ५ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या; राहुल चोप्रा भारताला नडला तरीही UAE चा संघ १६.५ षटकांत तंबूत परतला

Adul News : पावसाच्या अस्मानी संकटानंतर आता शेतमजुर टंचाईचे संकट

Supreme Court: ''चांगल्या शाळा उघडा'' सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, बोर्ड परीक्षांवरुन खरडपट्टी

Amey Wagh : गौतमी पाटीलमुळे चित्रपटाला फायदा ? अमेय वाघने सांगितला गौतमीचा खास गुण

SCROLL FOR NEXT