Eknath Shinde 
मुंबई

Eknath Shinde: शिवसेनेसाठी झटलो अन्...! आईच्या आठवणीनं CM शिंदे भावूक

एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा ५७ व्या वर्धापन दिन सोहळा नेस्को सेंटरमध्ये पार पडला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ShivSena 57th Anniversay : शिवसेनेसाठी झटताना आपण किती समर्पित होऊ काम करत होतो हे सांगताना आपल्या आईची एक आठवण सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही काळ भावूक झाले. शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन सोहळा एकनाथ शिंदे गटाकडून नस्को सेंटरमध्ये पार पडला, यावेळी ते बोलत होते. (ShivSena 57th Anniversay Eknath Shinde is emotional due to memory of his mother while working with Shiv Sena)

शिंदे म्हणाले, "लोकसभेची निवडणूक होती, माझी आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. उपचार सुरु असताना मला डॉक्टरचा फोन आला तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली. माझ्या शेजारी शिवसेनेचे उमेदवार गावीत होते. त्यांनी मला सांगितलं की इथे आपल्या सभा आहेत. या सभा नऊ वाजेपर्यंत संपतील.

कसं सांगू मी त्याला माझी आई नाही, माझ्या आईचा जीव गेला ती आता जगात नाही. मी त्यांना सांगितलं की आपण सभा पूर्ण करुयात, सभा पूर्ण करुन आलो आणि आईचं अत्यंदर्शन हॉस्पिटलमध्ये घेतलं" हे सर्व वर्णन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावूक झाले. (Latest Marathi News)

"काय मिळवलं आम्ही ही काय चूक केली, ही माझी चूक आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या जीवनात अनेक प्रसंग आले. जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा बाळासाहेब, दिघेसाहेब आपल्या सर्वांचा आधार यामुळं हा एकनाथ शिंदे तुमच्यासमोर उभा आहे" असंही यावेळी शिंदे म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

"मला दिघेंचा एकचं शब्द आजही आठवतो की, तुला लाखोंचे अश्रु पुसायचे आहेत, तुला रडून चालणार नाही. ते शब्द आजही माझ्या कानात आहेत मी अख्खा महाराष्ट्र माझा परिवार समजतो. माझे नेते, माझे साथी माझे सहकारी हाच माझा परिवार आहे. म्हणून मला थोडा जास्त वेळ काम करावं लागतं," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील जुन्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा

भारत स्वातंत्र्यानंतर मुंबई इलाख्यात कोल्हापूर अन् पहिल्या आमदारांपैकी बाबासाहेब खंजिरेंनाच मिळाली पुन्हा संधी!

IND vs NZ: काल अ‍ॅक्टींग करत मैदान गाजवले, आज ९व्या चेंडूवर त्रिफळे उडाले! Virat Kohli चे दोन भिन्न Video

SCROLL FOR NEXT