मुंबई महानगर पालिकेत मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ मध्ये पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकांचे निकाल समोर आलेत. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारलीय. शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांनी ४ हजार ४२७ मतं मिळवत भाजपच्या बबलू पांचाळ याना हरवलं आहे.
मुंबईतील मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ मध्ये पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं होतं. यानंतर आज निकाल समोर आलेत. या निवडणुकीची विशेष बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये तब्बल अठरा उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
या निवडणुकीत विठ्ठल लोकरे यांनी १ हजार ३८५ मतांनी विजयी होत भाजपच्या बबलू पांचाळ याना हरवलं आहे. विठ्ठल लोकरे यांना एकूण ४ हजार ४२७ मतं पडली, तर बबलू पांचाळ यांना ३ हजार ०४२ मतं पडली. विठ्ठल लोकरे हे या आधी याच मतदारसंघातील नगरसेवक होते. मात्र विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.
धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात
मतदारांचे आभार
विजयी झाल्यावर विठ्ठल लोकरे यांची प्रतिक्रिया दिली. हा विजय उद्धव ठाकरे यांना ही भेट असून पुढच्या निवडणूकांमध्ये भाजपच्या जागा कमी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विठ्ठल लोकरे यांनी गेली पंचवीस वर्ष त्यांच्यासोबत असलेल्या मतदारांचे देखील आभार मानलेत.
कोण आहेत विठ्ठल लोकरे :
विठ्ठल लोकरे हे २०१७ मध्ये महापालिका निवडणूक लढवत विजयी झाले होते. मात्र विधानसभा लढवण्यासाठी त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आणि ते शिवसेनेच्या गोटात सामील झालेत. शिसवणेकडून त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. मात्र विधानसभेत त्यांना यश मिळालं नव्हतं. अशात मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ च्या रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत विठ्ठल लोकरे विजयी झालेत
हेही वाचा - २०२० मध्ये 'या' सिनेमांचे येणार सिक्वल
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. याचा फायदा शिवसेनेला मुंबईत झालेला पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांनी मिळवलेल्या यशामुळे त्याचा फायदा शिवसेनेला मुंबई महानगर पालिकेत होताना पाहायला मिळेल. त्यामुळे आता शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.
shivsena candidate viththal lokare won from mankhurd in bmc by poll elections
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.