Shiv Sena Dasara Melava Live 
मुंबई

ShivSena Dasara Melava: ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! शिंदे अर्ज घेणार मागे

यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी अर्ज दाखल केले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत गेल्यावर्षी पेच निर्माण झाला होता. यंदा देखील पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली होती, पण अखेर हा पेच निकाली निघाला आहे. कारण शिंदे गटाचे आमदार आपला अर्ज मागे घेणार आहेत, त्यामुळं ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर पार पडणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

स्वतः सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली असून शिंदे गट कुठल्या मैदानावर मेळावा घेणार हे देखील सांगितलं आहे. (Shivsena Dasara Melava Uddhav Thackeray Group Shivaji Park Shinde group will withdraws application)

पुन्हा कोर्टाची पायरी?

यंदा १ ऑगस्ट रोजी ठाकरे गटानं तर ७ ऑगस्ट रोजी शिंदे गटानं महापालिकेकडं शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळं हे प्रकरण पुन्हा कोर्टात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर शिंदे गटानं आपला अर्ज मागे घेण्याचं ठरवलं असून आझाद मैदान किंवा क्रॉस मैदानात मेळावा घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळं आता शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचाच मेळावा पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे. (Latest Marathi News)

सरवणकर म्हणतात मला निर्देश

याबाबत बोलताना सरवणकर म्हणाले, "दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे. एकनाथ शिंदेंचं मत आहे की हिंदूंच्या सणांमध्ये कुठलाही वाद न होता तो आनंदात साजरा व्हावा. कारण या शासनाचं धोरणचं आहे, की सर्वच उत्सव हे आनंदात साजरे व्हावेत, बंधन दूर व्हावीत. त्यादृष्टीनं शिंदेंनी समजूतदाराचं पाऊल म्हणून हा दसरा मेळावा आझाद मैदान आणि क्रॉस मैदानावर व्हावा यासाठी तयारी सुरु केली. तशा प्रकारचे मला निर्देश दिले" (Marathi Tajya Batmya)

शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीपासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर पार पडत होता. पण गेल्यावर्षी एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं शिवाजी पार्कवर कुठल्या गटाचा मेळावा होणार याबाबत पेच निर्माण झाला होता.

दोन्ही गटांनी यासाठी दावा केल्यानं प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. पण कोर्टानं ठाकरे गटाला परवानगी दिली होती. त्यामुळं शिंदे गटाला बीकेसीच्या मैदानावर मेळावा घ्यावा लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT