BMC sakal media
मुंबई

BMC : प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर; सहा प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व

दोन प्रभागात भाजप वरचढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी महानगर पालिका निवडणुकीसाठी (BMC Election) प्रशासनाने मंगळवारी प्रभाग रचना जाहीर करुन त्यावर हरकती व सुचना मागवल्या आहेत. 2017 पेक्षा यंदा निवडणुक प्रभागांच्या (election ward) संख्या नऊ ने वाढली आहे. या नऊ पैकी सहा विभागात शिवसेनेचे (shivsena) वर्चस्व आहेत.तर,दोन प्रभागात भाजप (bjp) वरचढ आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणूक प्रभागांची संख्या 227 वरुन 236 झाली आहे. शहर, पूर्व उपनगर आणि पश्‍चिम उपनगर या प्रत्येक ठिकाणी तीन तीन प्रभाग वाढले आहेत. ही प्रभाग रचना प्रशासनाने आज सुचना व हकरतीसाठी जाहीर केली आहे.या सुचना व हकरत 14 फेब्रुवारी दुपारी 3 वाजे पर्यंत महानगर पालिकेकडे पाठवायच्या आहेत.मात्र,या प्रभाग रचनेवरुन शिवसेना विरुध्द भाजप असा वाद अधिक तिव्र होण्याची शक्यता आहे.

या ठिकाणी सुचना व हकरती पाठवा

-निवडणुक मुख्य कार्यालय,जे.वी.शाह मंडई,4 मजला,युसूफ मेहरअली मार्ग,मशिद बंदर,मुंबई -400009

-प्रत्येक प्रभागांच्या करनिर्धारण संकलन विभागातही सुचना व हकरती देता येणार आहेत.

-या मसुद्या नुसार दहिसर-मागाठाणे(आर उत्तर ),कांदिवली (आर दक्षिण) ,जोगेश्‍वरी अंधेरी पुर्व(के पुर्व)कुर्ला(एल ),घाटकोपर (एन),चेंबूर (एम पश्‍चिम)लालबाग परळ (एफ दक्षिण ),वरळी प्रभादेवी (जी दक्षिण ),भायखळा (ई) या ठिकाणी प्रत्येक एक प्रभाग वाढला आहे.

-आर उत्तर,के पुर्व,एल,एन,एफ दक्षिण,जी दक्षिण या सहा प्रभागांमध्ये शिवसेनेची नगरसेवक संख्या जास्त आहे.

-आर दक्षिण,एम पश्‍चिम या दोन प्रभागात भाजपचे वर्चस्व आहे.

-ई प्रभागात समिश्र परीस्थीती आहे.

प्रभागांची संख्या

-पश्‍चिम उपनगरे - 102

-पुर्व उपनगरे -69

-शहर -56

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT