Bahujan Vikas Aaghadi sakal media
मुंबई

विरार : शिवसेनेला खिंडार; 40 शिवसैनिकांचा 'बविआ'त प्रवेश

संदिप पंडित

विरार : एका बाजूला शिवसेनेत (Shivsena) काही दिवसापासून इनकमिंग सुरु असतानाच अचानकपणे आता शिवसेनेतील निष्ठावंत शिवसैनिक शिवसेना सोडून बविआ (Bahujan Vikas Aaghadi) मध्ये जाऊ लागल्याने हा शिवसेनेला धक्का मानला जात आहे. विरार (Virar) पश्चिमेकडील शिवसेना शहर समन्वयक वैभव विलास पांडे (vaibhav pandey) व सुमारे 35 ते 40 पदाधिकारी व शिवसैनिकांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत (Shivsena leaders) बहुजन विकास आघाडीत प्रवेश केल्या.

शिवसेनेत वसई तालुक्यात काही प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना सतत जुन्या जाणत्या व ज्यांनी खडतर काळापासून शिवसेना जनसामान्यात रुजवली, वाढवली, मतदारांपर्यंत व घराघरात भगवा पोचवून हक्काचा मतदार तयार केला त्यांनाच सतत डावलले जातं असल्याचा व वेगवेगळ्या पक्षातून स्वार्थासाठी आलेल्याना मोठमोठी पदे देण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी बविआ मध्ये वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी बविआचे संघटक सचिव अजीवजी पाटील, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी सभापती सखाराम महाडिक, माजी नगरसेवक प्रशांत राऊत, नेते विलासबंधू चोरघे, प्रफुल साने, आनंद पाटील, जयेश ठक्कर उपस्थित होते.

शिवसेनेतून बविआमध्ये प्रवेश केलेल्यामध्ये शिवसेना विरार शहर समन्वयक व माजी शहर प्रमुख वैभव विलास पांडे, ग्लोबल सिटी विभाग प्रमुख दर्शन मोहिते, तिरुपती विभाग प्रमुख हर्षद जानवलकर, डोंगरपाडा विभाग संघटिका रेणुका पांडे, उपविभागप्रमुख पारितोष पाटील, मेहुल वझे, शाखाप्रमुख अक्षय तेली, शत्रुघ्न जयस्वाल, उपशाखाप्रमुख प्रवीण केंद्रे, महिला आघाडी शाखासंघटक अंजली सरवणकर, पूजा जयस्वाल, उपशाखासंघटक माधुरी कौशिक, दुर्वा मोहिते, सोनल शाह, मनीषा शर्मा, युवासेनेचे पदाधिकारी निखिल नाडकर, रोहित हळदणकर, भावेश वाघेला, योगेश लाड, सौरभ राजपूत, तेजस पवार, मित शाह, वेदांत परब, ध्रुव भट शिवसैनिक संजय नरिम, संजय विश्वकर्मा, वैभव खंदारे, दिवाकर विंदा व इतर शिवसैनिक यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT