MNS mla raju patil sakal media
मुंबई

वचनपूर्ती केली आता बॅनर लावा; शिवसेना खासदारांचा मनसे आमदारांना चिमटा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी रस्त्यांच्या विकासासाठी (MIDC Road development) निधी मंजूर होतात, बॅनर देखील लागतात मात्र कामाची सुरुवात होत नाही. यावरुन मनसेने (MNS) कधीतरी तयार झालेले रस्ते दाखवा अशा आशयाचे बॅनर (flex) एमआयडीसी भागात लावत शिवसेनेला (shivsena) डिवचले होते. गुरुवारी या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याहस्ते करण्यात आल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (dr shrikant shinde) यांनी शिवसेना वचन देते आणि आज ही वचनपूर्ती झाली आहे.

आता आमदार पाटील यांनी आमच्या अभिनंदनाचे बॅनर लावावेत असा चिमटा काढला. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील व्यासपीठावर उपस्थित आमदारांना बॅनर आता लावावेच लागतील असा खोचक सल्ला दिला. यावर आमदार पाटील यांनी काम सुरु होताच मी अभिनंदनाचे बॅनर लावणार असे आश्वासन सत्ताधाऱ्यांना दिले. डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांची काम गेले अनेक वर्षे न झाल्याने या रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटींचा निधी मंजुर झाला असून 20 वर्षापासून रखडलेले रस्ते लवकरच नीट होणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आणि त्याचे बॅनरदेखील या भागात लागले होते.

बॅनर लागून सहा सात महिने उलटले तरी कामास सुरुवात न झाल्याने यावरुन मनसेने शिवसेनेला ट्रोल करीत एमआयडीसी परिसरात बॅनर लावले होते. कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा असे या बॅनरवरील ठळक विधान शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी श्रेयाचे लागलेले बॅनर तिनदा फाटले पण काम झाले नाही असा खोचक टोला ट्विटरच्या माध्यमातून लगावला होता. गुरुवारी या रस्त्याचे भूमिपूजन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील उपस्थिती लावली होती.

ही चालून आलेली संधी खासदार शिंदे यांनी न गमावता व्यासपीठावर उपस्थित मनसे आमदार पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, रस्त्यांच्या कामासाठी निधी आणला टेंडर देखील निघाले असून आता त्या कामांचा शुभारंभ देखील झाला आहे. शिवसेना वचन देते आणि आज ही वचनपूर्ती झाली आहे. काही लोकं म्हणाले होते की काम करुन दाखविल्यास अभिनंदनाचे बॅनर लावू, तर उद्या हे बॅनर लागतील यात तिळमात्र शंका नाही असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला. यावर पाटील यांनी व्यासपीठावरच त्यांना इशारा करीत बॅनर लावणार असे सांगितले. तसेच पालकमंत्री शिंदे यांनी देखील पाटील यांना तुम्हाला बॅनर लावावे लागतील असा खोचक सल्ला दिला.

यावर मनसे आमदार पाटील म्हणाले, चांगले काम केले तर अभिनंदन आणि कौतुक करण्यास काहीच हरकत नाही. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे, हा लोकांचा विजय आहे आणि काम सुरु झाले तर मी अभिनंदनाचा बॅनर नक्की लावणार असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT