शिवसेनेच्या खासदाराचे नामकरणाच्या मुद्द्यावर सूचक वक्तव्य
मुंबई: नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai International Airport) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव द्यायचं की दि बा पाटील (Di Ba Patil) यांचं नाव द्यायचं या मुद्द्यावरून गेले काही दिवस वाद (Debate) सुरू आहे. त्यातच मानखुर्द घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर छेडानगर ते मानखुर्दपर्यंत होत असलेल्या पुलाच्या (Mankhurd Flyover) नावावरून वाद निर्माण झाला आहे. मानखुर्दच्या फ्लायओव्हरला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नावे देण्यात यावे, या मागणीला शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (Shivsena Rahul Shewale) यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे (BJP) नेतेमंडळी त्यांच्यावर आणि शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करताना दिसत आहेत. शेवाळे यांनी या टीका करणाऱ्यांना उत्तर देत एक सूचक वक्तव्य केलं. (Shivsena MP Rahul Shewale agrees to Name Suggested by BJP MP Manoj Kotak about Mankhurd Flyover)
"लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडतोय. माझ्या क्षेत्रातील लोकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ते मी केलं. हा फ्लायओव्हर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाच्या सीमेवर आहे. कोटक यांनी या फ्लायओव्हरसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव सुचवले होते याची मला कल्पना नव्हती. शिवराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे नाव फ्लायओव्हरला देण्यात आले तर शिवसेनेतील कोणीही त्याला विरोध करणार नाही", असे शेवाळे यांनी स्पष्ट केले.
"मला असंदेखील समजलं आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या पुलाला द्यावे यासाठी काही लोक आग्रही आहेत. मला त्यात वादात अडकायचे नाही. अखेर मुंबई महापालिका जे नाव अंतिम करेल, तेच नाव या पुलाला दिले जाईल. काही नेतेमंडळी या नामकरणाच्या विषयाला उगीचच धार्मिक रंग देत आहेत. जे लोक मला आणि शिवसेनेला सोशल मिडियावर ट्रोल करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की आपण सध्या कोरोनाशी लढतो आहोत. त्यामुळे त्या विषयाचे गांभीर्य बाळगायला हवे", असे शेवाळे म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेने या फ्लायओव्हरला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. याबद्दल बोलताना त्यांचे मुंबईतील प्रवक्ते श्रीराज नायर म्हणाले, "या पुल मानखुर्द येथे बांधला जात आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांसाठी बहुमुल्य योगदान देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचेच नाव या पुलाला देण्यात यायला हवे. तसे न झाल्यास विश्व हिंदू परिषदेकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.