मुंबई

माय लॉर्ड, मंदिरे उघडा हो! 'कोणी' केली ही मागणी जाणून घ्या

पूजा विचारे

मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या वृत्तपत्रातून मंदिरं खुली करण्याची मागणी केली आहे. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. लॉकडाऊनमध्ये उद्योगधंद्यांना तोटा सहन करावा लागला. त्याचा फटका व्यापाऱ्यांसह नोकरदारांदेखील बसला. यानंतर आता हळूहळू उद्योगधंदे पूर्वपदावर येत आहेत. कारखाने, कार्यालयं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी मंदिरं मात्र अद्याप बंद आहेत. यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयानं फेटाळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनामधून मंदिरं सुरू करण्याचं आवाहन केलं आहे.

मंदिरांचंही एक अर्थकारण असतं आणि त्यावरही असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरं आणि इतर प्रार्थनास्थळं सोडवत असतात. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. त्यामुळे राज्य चालविण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल आणि त्यात काय चुकले? आम्ही स्वत मंदिरे, व्यायामशाळा खुल्या कराव्यात या मताचे आहोत, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

मंदिराचेही एक अर्थकारण असतेच आणि त्यावरही असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थळेच आहेत आणि मंदिरातील देव हे दुर्बलांना आधार देत असतात. प्रत्येकाच्या मानण्यावर ते आहे. कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरे व इतर प्रार्थनास्थळे सोडवीत असतात. तेव्हा मंदिराचा विषयही आर्थिक उलाढालीचाच आहे, माय लॉर्ड चूकभूल द्यावी घ्यावी, असं आवाहन अग्रलेखातून करण्यात आलं आहे. 

काय म्हटलं आहे अग्रलेखात 

  • देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल व त्यात काय चुकले? आम्ही स्वतः मंदिरे, व्यायामशाळा खुल्या कराव्यात या मताचे आहोत. मंदिराचेही एक अर्थकारण असतेच व त्यावरही असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थळेच आहेत व मंदिरातील देव हे दुर्बलांना आधार देत असतात. प्रत्येकाच्या मानण्यावर ते आहे. कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरे व इतर प्रार्थनास्थळे सोडवीत असतात. तेव्हा मंदिराचा विषयही आर्थिक उलाढालीचाच आहे, माय लॉर्ड! चूकभूल द्यावी घ्यावी. 
  • गेल्या सहा महिन्यांपासून देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे ‘लॉक डाऊन’ आहेत. त्यात मंदिरेसुद्धा आहेत. देवांनासुद्धा कोरोनाने बंदिवान करून ठेवले. आता ही मंदिरे, प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळे उघडा अशी मागणी जोर धरू लागली आहे. पर्युषण काळात मंदिरे उघडण्याची परवानगी जैन धर्म बांधवांना दिली. ही परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. कोरोनाचे संकट मोठे आहे म्हणून सरकारला कठोर पावले उचलावी लागली. कोरोनाची भीती नसती तर न्यायालयेही ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने चालवली नसती. कोरोनाच्या भयाने सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजही नेहमीच्या खुल्या पद्धतीने चाललेले नाही. मात्र त्याच न्यायालयाला असे वाटते की, सरकारने इतर सर्व बंधने शिथिल करावीत.

Shivsena saamana editorial Demands Open Temples SC

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

Junior National Kho Kho Championship स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे कर्णधार

SCROLL FOR NEXT