मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून जया बच्चन यांची पाठराखण करण्यात आली आहे. त्यासोबतच बॉलिवूडला बदनाम करणाऱ्या लोकांवरही सडकून टीका केली आहे. खासदार जया बच्चन यांनी काल राज्यसभेत आवाज उठवला आणि बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांवर टीका देखील केली. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. आज शिवसेनेनं देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हिंदी सिनेसृष्टीचा लौकिक जागतिक स्तरावर आहे. हॉलिवूडच्या बरोबरीने बॉलिवूडचे नाव घेतले जाते. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती आहेत, तसे नीरव मोदी, मल्ल्याही आहेत. बॉलिवूडचंही तसंच आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं बॉलिवूडला बदनाम करणाऱ्या मंडळींवर हल्लाबोल केला आहे.
सिनेसृष्टीचे गटार झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या झांजा असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. 'सब घोडे बारा टके' असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली, असं म्हणत शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण केली आणि कंगना राणावतवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यानंतर बॉलिवूडवर बरेच आरोप प्रत्यारोप सुरु आहे. आता याच विरोधात काल जया बच्चन यांनी राज्यसभेत आवाज उठवला आणि बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांवर टीका देखील केली.
Shivsena saamana editorial support jaya bachcha attack kangana ranaut
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.