Aadesh Bandekar Esakal
मुंबई

Mumbai News: आदेश बांदेकर यांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेनेच्या 'या' आमदारांची लागली वर्णी

अंकिता खाणे (Ankita Khane)

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष होते. त्यांची मुदत 23 जुलैला संपली होती. दरम्यान चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर शिंदे गटाचे सरवणकर यांची नियुक्ती केली आहे.

हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर चर्चेत

गेल्या गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी सखोल चौकशी झाली. त्यानंतर सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती.

सदा सरवणकर हे 1992 ते 2007 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये मात्र सदा सरवणकरांनी तिकीट नाकारत पक्षाकडून आदेश बांदेकरांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यावेळी नाराज झालेल्या सदा सरवणकरांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2009 ची निवडणूक लढवली होती.

2012 मध्ये सरवणकरांनी काँग्रेसमधून पुन्हा घरवापसी केली. त्यानंतर सर्वात आधी 2014 मध्ये आणि त्यानंतर 2019 मध्ये सदा सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT