मुंबई

शिवसेनेची पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने, आमदार प्रकाश सुर्वे यांचा केंद्राला इशारा

कृष्ण जोशी

मुंबई:  मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीकडे आगेकूच करीत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शहरात ठिकठिकाणी घोडागाड्यांसह तसेच हातगाड्यांसह निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारने वेगवेगळे कर कमी करून इंधनाचे भाव कमी करावेत आणि जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा याहून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिला आहे. 

एकीकडे आज शहरात काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी वीज दरवाढीबद्दल राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली. तर शिवसैनिकांनी इंधन दरवाढीबद्दल केंद्राचा निषेध केला. या राजकीय जुगलबंदीमुळे सर्वसामान्यांची चांगलीच करमणूक झाली. 

आज बोरिवली, दादर, कुर्ला आदी ठिकाणी शिवसैनिकांनी इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने केली. कुर्ला (पू.) रेल्वे स्थानकाबाहेर कुर्ला-कलिना विभाग शिवसेनेतर्फे ही निदर्शने झाली. दादरच्या सेनाभवनशेजारील पेट्रोल पंपासमोरही शिवसैनिकांनी निदर्शने केली. बोरीवलीच्या (पू.) ओंकारेश्वर मंदिराजवळही शिवसेना विभाग क्रमांक एक तर्फे सुर्वे तसेच विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने झाली. हातात निषेधाचे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत काहीकाळ वाहतूकही विस्कळीत केली.

मुंबईत पेट्रोलचे दर 93 रुपयांच्यावर गेले आहेत. या दरवाढीला केंद्र सरकारच जबाबदार आहे. कारण जगातील अन्य कित्येक देशात हे दर खूपच कमी आहेत. एकतर सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय बुडाल्याने उत्पन्न कमी झाले आहे. लोक आधीच त्रासले असून केंद्राने इंधन दरवाढ करून त्यांच्या त्रासात भर घातल्याने त्याचा निषेध करण्याची गरज आहे. केंद्राने इंधनावरील अन्य कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही सुर्वे यांनी केली. 

हातगाड्या आणल्या
 
आभाळाला दर भिडलेले इंधन परवडत नसल्याचा निषेध करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी अभिनव मार्ग वापरला होता. काहींनी भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्यांवरून कार्यकर्त्यांना बसवून त्या गाड्या ढकलत आणल्या होत्या. काहींनी आपल्या दुचाकी देखील ढकलत आणल्या होत्या. काही ठिकाणी कार्यकर्ते सायकलवरून निषेध करण्यासाठी आले होते. गोरेगावात तर कार्यकर्त्यांनी घोडागाड्या आणल्या होत्या. केंद्राने इंधन दरवाढ अशीच सुरु ठेवली, तर यापुढे जनतेला प्रवासासाठी हेच मार्ग वापरावे लागतील, अशी प्रतिक्रियाही हे कार्यकर्ते देत होते.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Shivsena today protest central government fuel price hike prakash surve

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT