मुंबई- उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठी ट्रॉम्बेत सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राजकारणात तुम्हाला संतान होत नाही तर माझी काय चूक. आमची मुलं तुम्हाला घ्यावी लागतात. आणखी पाहिजे असतील तर घेऊन जा. गद्दार गेले तर आम्हाला फरक पडत नाही. पण आता आमच्याकडे गद्दार राहिले नाहीत, असं ते म्हणाले.
भाजपचे बोरिवलीचे उमेदवार पियूष गोयल कोळीवाडा येथे गेले तर नाकाला रुमाल लावून गेले. जिथे झोपडी आहे तिथेच घर मिळाली पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न आहे. धारावी अडानी कडे, सर्व जमीन , एअर पोर्ट अदानीला दिले. मोदी स्वतःच बोलले अदानी आणि अंबानी बद्दल, राहुल गांधी यांना किती पैसे दिले. तुमच्या हातात देशात सत्ता आहे. Ed, CBI आहे ते कुठे बसले होते. ठेल्यावर चकणा घेऊन बसले होते का ? असा सवाल ठाकरेंनी केला.
मोदी विश्वगुरु आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. किती जणांना रोजगार मिळाला? किती जणांना घरं मिळाले? दहा वर्षानंतर तेच काय विचारत आहात. २०१९ मध्ये दिलेली आश्वासनं मोदींना २०२४ मध्ये लक्षात नाही. त्यांचं एक भाषण मला आजही आठवतं , गॅसची किंमत, डिझल,पेट्रोल किंमत वाढली की नाही वाढली. मतदानाला जाताना महिलांना त्यांनी सांगितलं की गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. पण, आता किती किंमती आहेत. मध्यंतरी लसूण 400 पार गेलं पण मोदींनी 400 पारचा नारा दिला तर तो पण लाजून कमी झाला,असा टोला त्यांनी लगावला.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना पंतप्रधान मोदी यांनी आव्हान दिलं होतं, की त्यांनी राज्यातील जिल्ह्याची नावे सांगावीत. मी मोदींना आव्हान देतो की, त्यांनी हातात कागद घेऊन त्यांनी दिलेली किती आश्वासने पूर्ण केलीत, हे सांगावं. गँसच्या किंमती किती वाढल्या, किती रोजगार दिला हे त्यांनी सांगावं. मोदी सरकार गजनी झालं आहे, असं ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडीचं सरकार नक्कीच देशात येणार आहे. जेव्हा केंद्रात सरकार येईल तेव्हा मुंबईची लुटलेली संपत्ती मी परत आणणार, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.