मुंबई

Navi Mumbai: नवी मुंबईत महायुती विरुद्ध महायुतीचे चित्र? वाचा काय आहे राजकीय परिस्थिती

Eknath Shinde vs Bjp vs Ajit Pawar: उपनेते विजय नाहटा यांनी शिंदे सेनेला रामराम करीत तुतारी हातात घेण्याची तयारी केल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Navi Mumbai News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईच्या राजकारणात उलथापालथ सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीची ताकद जास्त आहे.

नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपच्या असतानाही शिवसेनेच्या शिंदे सेनेतील उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी उमेदवारीकरिता तयारी केल्यामुळे महायुती विरुद्ध महायुती, असे चित्र निर्माण झाले आहे. अशातच उपनेते विजय नाहटा यांनी शिंदे सेनेला रामराम करीत तुतारी हातात घेण्याची तयारी केल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे राजकारण वेगळे ठरले आहे. अगदी २०१४ पासून ते २०१९ च्या निवडणुकीत नवी मुंबईतील नेत्यांनी त्यांच्या समीकरणांनी राज्याच्या नेतृत्वाला दखल घ्यायला लावली आहे. आता राज्यात तीन पक्षांच्या असणाऱ्या महायुती सरकारच्या काळात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी नवी मुंबई म्हणजे माजी मंत्री गणेश नाईक असे समीकरण असताना त्याला शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून मागे सोडले आहे.

मातब्बर नेते गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, अनेक वेळा निवडून आलेले नगरसेवक सुरेश कुलकर्णी, किशोर पाटकर, शिवराम पाटील, असे अनेक मोठे नेते महायुतीमध्ये आहेत. या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेही नेते उरले नाहीत. विशेष म्हणजे महायुतीच्या या उमेदवारांपुढे तग धरून राहील असा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे; तर महाविकास आघाडीला उमेदवार शोधण्याची गरज लागेल. अशी एकीकडे परिस्थिती असताना महायुतीच्या नेत्यांनी स्वतः उमेदवारी घोषित करीत पक्षातील ताकदीला छेद दिला आहे. ऐरोलीमध्ये विजय चौगुले यांनी तयारी सुरू केली आहे.

चौगुले यांनी ऐरोलीमधील सर्व रहिवासी परिसर, झोपडपट्टीबहुल भाग, गावठाण या भागावर आपला जनसंपर्क वाढल्यामुळे त्यांचे वजन वाढले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिले आहे. बेलापूर मतदारसंघात आमदार मंदा म्हात्रे असताना खुद्द जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दंड थोपटले आहेत, असे असताना विजय नाहटा हेसुद्धा जोरदार तयारी करीत आहेत, पण त्यांना जागा मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर आता ते लवकरच तुतारी हातात घेत आहेत.

महाविकास आघाडीला फायदा

विजय नाहटा लवकरच तुतारी हातात घेणार असल्यामुळे नवी मुंबईच्या दोन्ही मतदारसंघात महायुतीची ताकद विभागली जाणार आहे. त्यामुळे ताकद नसतानाही त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे. नाहटा राष्ट्रवादीत गेल्यावर त्यांचे समर्थक आणि शिंदे सेनेचे त्यांना मानणारे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराचे काम करतील यात साशंकता आहे, तसेच विजय चौगुले हे नाराज झाल्यास त्यांचे समर्थकही भाजपच्या गणेश नाईक यांचे काम करतील की नाही याची शंका आहे. दोन्ही मतदारसंघात परस्पर विरोधी वातावरण निर्माण झाल्यामुळे महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मारक ठरणार आहे.

अमच्या पक्षातून कोणी गेले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्या उमेदवाराचा दावा लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत.

- विजय चौगुले, जिल्हाप्रमुख, शिवसेना

लोकआग्रहाचा मान ठेवावा लागणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मला नक्की स्वीकारतील. लवकरच नवीन उलथापालथ होईल.

- विजय नाहटा, माजी सनदी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT