मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली. यंदा राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असल्याने देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या यंदा कुणाकडे जाणार याबाबत चर्चा होती. काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने यंदाच्या निवडणुकीबाबत शिवसेनेच्या गोटात धाकधूक होती. मात्र शिवसेनेने यंदाही भाजपाला स्थायी समिती सभापती पदापासून दूर ठेवण्यात यश मिळालंय. राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला मुंबई मनपात पाहायला मिळाला. मुंबई मनपाच्या निवडणुकीतही तीनही पक्षांनी एकत्रित येत भाजपाला दूर सारलंय.
महत्त्वाची बातमी : 'राज साहेब, परप्रांतिय मासेविक्रेत्यांना हटवा'; कोळी भगिनींनी मांडले गऱ्हाणे
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. यंदाही मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेने स्वतःकडे ठेवल्यात. स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे यशवंत जाधव पुहा निवडून आलेत. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसने नाट्यमयरित्या माघार घेतल्याने स्थायी समिती सभापतीपदावर पुन्हा म्हणजेच तिसऱ्यांदा यशवंत जाधव यांची निवड झालीये. निवडणुकीसाठी यशवंत जाधव यांना शिवसेनेनं तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती.
स्थायी समितीत शिवसेनेकडे 11, भाजप 10, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी 1 असे संख्याबळ होते.
महत्त्वाची बातमी : उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला
शिक्षण समितीची अध्यक्षपदाची निवडफणूक देखील आज पार पडली. या निवडणुकीतही नाट्यमय घडामोडी घडल्यात. भाजपच्या सुरेखा पाटील यांना पराभूत करत शिवसेनेच्या संध्या दोषी यांच्या गळयात शिक्षण समिती अध्यक्षपदाची माळ पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षाने देखील शिवसेनेच्या संध्या दोषी यांना पाठिंबा दिला होता.
यंदा कोरोनाचं सावट असल्याने अनेक महिने लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे या स्थानिक निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.
shivsenas yashwant jadhav wins BMC standing committee chairperson election
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.