मुंबई : महाराष्ट्रात कोरोना वेगानं पसरत चालला आहे. राज्यात कोरोनाचे एकूण ४७ रुग्ण आढळले आहेत. तर शासनाकडून लोकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन केलं जातंय. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या काही भागांमध्ये दुकानं एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नॉवेल कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोना राज्यात पसरू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईच्या काही भागांमध्ये दुकानं एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. गर्दीची ठिकाणं आणि बाजारपेठ असलेल्या परिसरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुंबईच्या काही भागांमध्ये दुकानं सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार यादिवशी खुली असणार आहेत. तर काही भागांमध्ये दुकानं मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार यादिवशी सुरु असणार आहेत.
कुठली दुकानं राहणार एक दिवसाआड बंद:
सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार या भागातील दुकानं सुरु राहणार :
दादर:
माहीम:
धारावी:
मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार या भागातील दुकानं सुरु राहणार :
दादर:
shops will remain close by one day gap in some parts of mumbai read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.