mla kisan kathore sakal
मुंबई

Shri Malanggad News : श्री मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रॉलीची ट्रायल; आमदार किसन कथोरे यांनी केली पहाणी

ठाणे जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मलंगगड येथील फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू होण्याची सारेच वाट पहात आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मलंगगड येथील फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू होण्याची सारेच वाट पहात आहेत. या फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. या ट्रॉलीची ट्रायल सध्या कंपनीच्या मार्फत घेण्यात येत आहे.

गुरुवारी सकाळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रॉलीने जात कामाची पाहणी करत गडावर मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले. 20 वर्षाचे स्वप्न पूर्णत्वास येत असल्याची भावना यावेळी आमदार कथोरे यांनी व्यक्त केली.

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंग हे नवनाथांचे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र आहे. श्रीमलंगगड हा हिंदू व मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याने वर्षभर गडावर भाविकांचा राबता असतो. सद्यस्थितीत गडावर जाण्यासाठी सुमारे अडीच हजार पायऱ्या आहेत. परंतु उभा चढ असल्याने भाविकांची दमछाक होते. भाविकांचे होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे यांनी मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प राबविण्याचा विचार केला.

परदेशात कथोरे यांनी हा प्रकल्प पाहिला असता भारतात तो राबविण्याची संकल्पना त्यांना सुचली. त्यांनी त्या दृष्टीने सर्व प्रयत्न सुरू केले. राज्य सरकारने या ठिकाणी फ्युनिक्युलर प्रकल्प राबविण्याचा निर्णयाला 2007 साली मंजुरी दिली. 2008 साली निविदा प्रक्रिया पार पडून 2012 ला कामास सुरवात झाली.

मात्र 2014 मध्ये हे काम बंद पडल्याने त्याबाबत राजकीय उदासीनता दिसून आली यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या कामाचा पाठपुरावा करत कामाला गती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या कंत्राटदाराची बदली करत वणी येथील कंत्राटदारास हे काम दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील यात लक्ष घालत सातत्याने या कामाचा आढावा घेत हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर श्री मलंगगडावरील फ्युनिक्युलरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रोलीचे काम पूर्ण झाले असून त्याची ट्रायल कंपनीने सुरू केली आहे.

माघ पौर्णिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ट्रॉलीचे लोकार्पण केले जाणार असल्याची चर्चा होती. खासदार डॉ. शिंदे यांनी तसे सूतोवाच मागे दिले होते. त्यानुसार कामाने गती पकडली आहे. मात्र काम पूर्ण होण्यास आणखी काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. ट्रॉलीचे लोकार्पण केले गेले तरी प्रत्यक्षात ही सेवा नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे फ्युनिक्युलरने गडावर जाणार?

येत्या शनिवारी श्रीमलंग गड येथे माघ पौर्णिमेनिमित्त हिंदू भाविक व शिवसैनिक मोठ्या संख्येने मलंग गडावर जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः यावेळी उपस्थित राहणार असून ते गडावर जाणार आहेत. मागील वर्षी मुख्यमंत्री हे हेलिकॉप्टरने गडावर गेले होते. यंदा या फ्युनिक्युलर ट्रॉलीने ते गडावर जातात का? हे आता पहावे लागेल.

भाजप शिवसेनेत श्रेयाची चढाई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार किसन कथोरे असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला होता. सध्याच्या घडीला कथोरे हे भाजपमध्ये आमदार म्हणून कार्यरत आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी या रखडलेल्या कामास गती दिली आहे.

माघ पौर्णिमेला शिवसेनेच्या वतीने मलंगगडावर आरती देखील करण्यात येते. यामुळे या कामाचे श्रेय शिवसेना लाटण्याची शक्यता असतानाच आमदार कथोरे दोन दिवस आधीच ट्रॉलीची ट्रायल घेत मलंगडावर गेले. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा विकास कामावरून श्रेय लाटण्याची चढाई दिसून आली आहे.

20 वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले

खऱ्या अर्थाने जवळपास 20 वर्षाचे स्वप्न पूर्ण होत आहे. 2004 ला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 2007 ला त्याचे काम सुरू झाले असून आता ते पूर्णत्वास येत आहे. आज ट्रायल घेताना मनातलं स्वप्न होत. भूमिपूजन च्या दिवशी मी तशी घोषणा केली होती. की जर दर्शनाला मी वर जाणार असेल तर फ्युनिक्युलरनेच जाईल. ते काम पूर्ण होऊन त्याला दिशा मिळते याचा मनापासून आनंद वाटतो.

मध्ये काम बंद पडले होते त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहकार्य करत रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लातुरे यांना आग्रह केला. चांगला अनुभव वणीचा त्यांना असल्यामुळे पहिली एजन्सी रद्द करत लातुरे यांच्या एजन्सीला काम दिले. हे काम पूर्ण होऊन महिन्याभरात त्याचे ट्रायलचे काम पूर्ण होईल.

नागरिकांना लवकरच ही सुविधा मिळेल याचा आनंद आहे. ज्या नागरिकांना वरती पायी जाता येत नाही अशा लोकांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. खरे म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेट मध्ये याला पहिली मान्यता मिळून भारतातील पहिला प्रोजेक्ट हा मंजूर होत. त्याला दिशा मिळाली होती. त्याला आज अंतिम स्वरूप येत हाच आनंद. हे तिर्थस्थळ भारतात प्रसिद्ध असून याला चांगला प्रतिसाद मिळेल.

- किसन कथोरे, आमदार

1200 मीटर लेंथ या प्रकल्पाची आहे. येथे दोन कोच मध्ये 50 आणि 50 असे ताशी हजार पॅसेंजर वर खाली ये जा करतील. हा सर्व प्रोजेक्ट हॉंगकॉंगच्या आधारे केलेला आहे. आमदार कथोरे यांनी या प्रकल्पातील अडचणी दूर करण्यास मदत केली. हा देशातील आशियातील दुसरा लॉंग रुट आहे. अँगल 20 डिग्रीचा आहे.

एक महिन्याच्या आत चाचण्या पूर्ण करून मुख्यमंत्री शिंदे, बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्याचा मनोदय आहे. 200 करोडच्या आसपास या प्रकल्पासाठी खर्च आला आहे. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुविधा उपलब्ध असेल.

- शिवशंकर लातुरे, मॅनेजिंग डायरेक्टर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT