डोंबिवली - लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मैत्रीचा हात देत विजयापर्यत नेले. आगामी विधानसभा निवडणुकीत ही मैत्री कायम दिसणार का ? यावर मनसे आमदार पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही आमच्या हिशोबात लढू.
मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, येथील खासदार व माझे मित्र म्हणून माझी त्यांना एवढीच विनंती असेल, की माझ्या मतदारसंघातील विकास कामांसाठीचा निधी त्यांनी त्वरित मंजूर करावा. एवढे केले तरी मैत्री निभावली असं मी समजेल. असे म्हणत आमदार पाटील यांनी खासदार शिंदेंना मैत्रीची जाणीव करून दिली आहे का ? याची एक वेगळीच चर्चा होऊ लागली आहे.
निर्भय जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मैत्रीचा हात देऊ केला होता.
मनसेच्या मदतीच्या जोरावरच शिवसेनेला येथे विजय मिळविता आला आहे हे सर्वश्रुत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत या मैत्रीची पुनरावृत्ती होणार का ? भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिंदे गटातून अनेक जण येथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी आमदार पाटील यांना केला. यावर ते म्हणाले,
मी कसं बोलू त्याच्यावर. आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. मनसेने मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता. आम्ही राज साहेबांचा आदेश होता त्यानुसार केलं. आता त्यांच राजकारण कसे चालत हे त्यांना माहीत. आम्ही आमच्या हिशोबातच लढणार आहोत. बघू त्यांनी पुन्हा चांगुलपणा दाखविला तर स्वागत आहे.
परंतू एक सांगतो ते समोर उभे राहिले आणि मी निवडून आलो तर त्यांची डबल नाचक्की होईल. लोक त्यांना बोलणार त्यामुळे तो विचार त्यांनी करावा किंवा नाही करावा ? त्यांचा प्रश्न. विधानसभा निवडणुकीत ते मदत करतील किंवा नाही करतील. त्यांच्याही काही अडचणी असतील त्याच्यामध्ये. त्यावेळी त्यांची पक्षीय धोरण वेगळी होती.
तो कॉल त्यांचा असेल. परंतु या क्षणाला माझी एक अपेक्षा त्यांच्याकडून आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र म्हणून, इथले खासदार म्हणून आणि माझे मित्र म्हणून विकास कामांसाठी मी जो निधी मागितला आहे तो त्वरित दिला तर बरे होईल. कारण ही काम त्यांच्याच मतदारसंघातील आहेत. त्यांनी एवढं केलं तरी मैत्री निभावली असे मी समजेल असे आमदार पाटील म्हणाले.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून रमाकांत मढवी, राजेश मोरे, भाजपकडून संदीप माळी या इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. मनसे कडून आमदार राजू पाटील यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती येथे काय भूमिका घेते हे पहावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.