Ayodhya Ram Mandir sakal
मुंबई

Ayodhya Ram Mandir : मुंबईत श्रीराम आनंद सोहळा आणि गीत रामायण कार्यक्रमाचे भाजपकडून आयोजन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने श्रीराम आनंद सोहळ्याच्या माध्यमातून भव्य गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गदिमा यांचे शब्द आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचं संगीत आणि मधूर आवाज असलेली गाणी नामांकित गायकांकडून ऐकण्याची सुवर्णसंधी मुंबईकराना मिळणार आहे.

२० ते २३ जानेवारी या कालावधीत मुंबईत चार ठिकाणी हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. याशिवाय मुंबईत ठिकठिकाणी प्रत्येक विभागात महाआरती, देवळांची साफसफाई, रोषणाई, विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाचे संयोजन जीवन गाणी तर संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे असणार आहे. गायक ऋषिकेश रानडे, निनाद आजगावकर, अभिषेक नलावडे, सोनाली कर्णिक, केतकी भावे - जोशी यांचे गीत सादरीकरण डॉ. संजय उपाध्ये यांचे निवेदन तर सोनिया परचुरे आणि ग्रुपचे नृत्य सादरीकरण असणार आहे. मोफत प्रवेशिका दोन व्यक्तींसाठी असणार बुधवारपासून या प्रवेशिका नाट्यगृहात उपलब्ध करुन देण्यात येतील.

संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा

या निमित्ताने महाराष्ट्रातील संताचा भव्य दर्शन सोहळा ही आयोजित करण्यात आला आहे. अक्लकोट येथून स्वामी समर्थाच्या, शिर्डीतून साई बाबांच्या, सज्जनगडावरुन रामदास स्वामी आणि शिमोगा येथून श्रीधर स्वामी तसेच शेगाव येथून गजानन महाराजांच्या पादूका मुंबईत दर्शनासाठी आणण्यात येणार आहेत. २३ जाने सकाळी ८.३० ते रात्री ९.३० पर्यंत अंधेरीतील सिम्फनी बँक्वेटला या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

कार्यक्रम

२० जाने- रात्री ८.३० वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व)

२१ जाने- सायं. ६.३० वा. साहित्य संघ मंदिर, गिरगाव

२२ जाने- सायं. ६.३० वा. रंगशारदा, वांद्रे (प.)

२३ जाने- रात्री ८.३० वा. यशवंत नाट्यगृह, माटुंगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Mumbai News: मुंबई हादरली! भाजप माजी खासदाराच्या पुतण्याने संपवलं जीवन, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

SCROLL FOR NEXT