पाली : श्रीवर्धन तालुक्यातील (shrivardhan) जीवना बंदरावर (jivan port) लावलेल्या जाळ्यात रविवारी (ता.8) तब्बल 22 किलोचा घोळ मासा (ghol fish) 4 मच्छीमारांना सापडला आहे. हा मासा 2 लाख 61 हजार रुपयांना (fish demand in lac) स्थानिक व्यापाऱ्याने (local traders) विकत घेतला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई बाजारात (mumbai market) हा मासा तब्बल 5 ते 6 लाखांना विकला जाण्याची शक्यता आहे.
जीवना बंदरावरील मच्छिमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व त्यांचे आणखी एक साथीदार यांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाळी लावून ठेवली होती. अचानक जाळी जोराने हलली आणि हा मासा जाळीत सापडल्याचे लक्षात आले. ताबडतोब या मच्छिमारांनी त्याला बाहेर काढले व बंदरावर आणले. येथे माशाची बोली लावण्यात आली. व श्रीवर्धन येथीलच व्यापारी श्री तोडणकर यांनी हा मासा तब्बल 2 लाख 61 हजार रुपयांना खरेदी केला.
मुंबई किंवा इतर मोठ्या ठिकाणी या माशाला दुप्पट ते तिप्पट भाव मिळण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविली आहे. एका क्षणात या एका माशाने या मच्छिमारांना लखपती बनविले आहे. अचानक सापडलेल्या या बहुमूल्य माशामुळे मच्छिमार कमालीचे आनंदी झाले आहेत. कारण क्वचितच या जातीचा एवढा मोठा मासा येथे सापडतो. ही बाब सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे.
शल्यचिकित्सेत धागे बनविण्यासाठी वापर
या माशाचे जठर व फुफुस आदी अवयवांद्वारे शल्यचिकित्सेला लागणारे धागे (टाके) बनविले जातात. त्यामुळे माशाला एवढी किंमत मिळते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान हा मासा समुद्र किनाऱ्या लगत येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.