Signal system failure near Thakurli station mumbai local train services disrupted Sakal
मुंबई

Dombivli News : ठाकुर्लीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

मुंबईसह उपनगरात सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु असून त्यामुळे सखल भागात पाणी साचले. पावसाचा परिणाम लोकल वाहतुकीवरही झालेला पाहायला मिळाला. पावसामुळे आधीच मध्य रेल्वेची वाहतुक 15 ते 20 मिनिटे उशिराने होत होती.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - मुंबईसह उपनगरात सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु असून त्यामुळे सखल भागात पाणी साचले. पावसाचा परिणाम लोकल वाहतुकीवरही झालेला पाहायला मिळाला. पावसामुळे आधीच मध्य रेल्वेची वाहतुक 15 ते 20 मिनिटे उशिराने होत होती.

त्यात ठाकुर्लीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळच्या वेळेत गाड्या उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचा खोळंबा झाला.

कल्याण डोंबिवली शहरात पहाटे पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका लोकल वाहतुकीला बसला असून लोकलचे वेळापत्रक त्यामुळे कोलमडले. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याणच्या पुढे ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी 8 च्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला.

यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कसारा, कर्जतकडे जाणारी धिम्या व जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्ण विस्कळीत झाली. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली.

अनियमित वेळेने लोकल धावत होत्या. इंडिकेटरवर शून्य वेळ लावण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकात कोणती लोकल, कधी येणार याची कोणतीही माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. रेल्वेकडून फक्त सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती दिली जात होती.

सोमवार कामावर जाण्याचा आठवड्याचा पहिलाच दिवस. त्यात लोकल सेवेत गोंधळ उडाल्याने प्रवासी संतप्त झाले होते. यामध्ये महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी सर्वाधिक अस्वस्थ होते. अनियमित वेळेत असलेली एखादी लोकल कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात आली की अगोदर प्रवाशांनी तुडुंब भरून आलेल्या या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती. कसारा, कर्जतकडे जाणारे नोकरदार, भाजीपाला विक्रेते स्थानकांमध्ये अडकून पडले होते.

पावसामुळे कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर पाणी साचलं होते. त्यामुळे स्टेशन बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. एका मागे एक रिक्षाचा रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर वाहतूक कोंडी तर लोकलची वाहतूकही खोळंबली असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. वाहनचालकांना आणि नागरिकांना ट्राफिकमधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली.

रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने फलाटावरील प्रवासी निश्चिंत होते. बहुतांशी सर्वच रेल्वे स्थानकातील फलाटांवर रेल्वेने निवार वाढविणे, रूंदीकरण, नवीन जिन्याची कामे केली आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती लागत आहे. फलाटावरही प्रवाशांना छत्री घेऊन, रेनकोट घालून उभे राहावे लागते.

सोमवारी सकाळी कल्याण, डोंबिवली, कोपर, विठ्ठलवाडी, टिटवाळा, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात गेलेल्या बहुतांशी प्रवाशांनी अर्धा ते पाऊण तास लोकल येत नाही पाहून काहींनी रस्ते मार्गाने ओला, उबर, खासगी वाहनाने तर काहींनी घरी जाणे पसंत केले. लोकल सेवेतील गोंधळामुळे रस्ते मार्गावरील वाहतुकीत वाहनांची भर पडली होती. गेल्या महिनाभरातील अशाप्रकारे लोकल सेवा विस्कळीत होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी भांडुप परिसरात रेल्वे मार्गात पाणी तुंबल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT