Six 10th Class students suspended over Jay Ram slogans in school Parents association warns of agitation  
मुंबई

Jay Shri Ram in School : शाळेत 'जय श्रीराम' घोषणा; दहावीच्या ६ विद्यार्थ्यांच्या निलंबनवरून पालक संघटना आक्रमक

रोहित कणसे

मुंबई : शाळेत दहावीच्या ६ विद्यार्थांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्याने त्यांच्यावर निलंबनची कारवाई करण्यात आल्याचा प्रकार काल घडला. नवी मुंबईतील वाशी येथील सेंट लॉरेंस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. यानंतरा आता या निलंबनाविरोधात पालक संघटना आक्रमक झाली आहे.

या विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करत विद्यार्थ्यांना शाळेत परत ना घेतल्यास ठिय्या आंदोलन करणार असल्याचे पालक संघटनेचे पदाधिकारी विजय साळे यांनी जाहीर केलं आहे. या दहावीच्या विद्यार्थ्यांना पालकाना सोबत घेऊन या असं शाळेकडून सांगण्यात आलं आहे. दहावीचं वर्ष खूप मोलाचं असतं. भारतात जय श्री राम अशा घोषणा दिल्यानं निलंबित करणं निंदणीय प्रकार आहे. आम्ही याचा निषेध करतो असे पालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

माध्यमांतील वृत्तानुसार, सोमवारी सकाळी शाळेतील बाथरुममध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडला होता. ज्या विद्यार्थ्यांनी ही घोषणाबाजी केली ते इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थी आहेत. हा प्रकार शाळा प्रशासनाच्या कानावर आल्यानंतर मुख्याध्यापकांकडून घोषणाबाजी करणाऱ्या ६ विद्यार्थ्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे.

पण या घोषणा देण्यामागं काय कारण होतं? याची चौकशी देखील शाळेनं केली आणि नंतरच संबंधित विद्यार्थ्यांना बडतर्फ केल्याचंही सांगितलं जात आहे. पण अद्याप शाळेकडून यावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT