Six students were arrested in Mumbai for creating and selling fake Garba passes worth ₹6 lakh ahead of the festive season. Esakal
मुंबई

Fake Garba Passes: गरबा, 6 लाखांचे बनावट पास अन् 6 विद्यार्थी...; मुंबईतील स्टेशनरी स्टोअरमध्ये नेमकं काय घडलं?

आशुतोष मसगौंडे

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमासाठी 6 लाख रुपयांचे 600 बनावट पास छापल्याच्या आरोपावरून बोरिवली पोलिसांनी मंगळवारी सहा विद्यार्थ्यांना अटक केली. या आरोपी विद्यार्थ्यांनी अवघ्या पाच दिवसां 400 पासची विक्री केल्याचे एका आरोपीने सांगितले.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या प्रकरणी एक टीप मिळाली होती, तर एका इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकाने तक्रार देखील केली होती.

बोरिवली पश्चिम येथील बाळासाहेब ठाकरे मैदानावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या रायगड प्रतिष्ठान रंगराज गरब्यासाठी काही लोक बनावट पासेस विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याबाबतचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू करत पोलिसांनी नालासोपारा येथून अंश नागर (20) या आरोपीचा त्याच्या संपर्क क्रमांकावरून माग काढला. त्यानंतर पोलिसांनी थेट आरोपीला गाठले आणि बनावट पास कोठे बनवले याची चौकशी केली. शेवटी त्याने सांगितले की, त्याने कांदिवलीच्या चामुंडा स्टेशनरी स्टोअरमध्ये बनावट पास छापण्याचा कट रचला होता. हे स्टेशनरी स्टोअर या प्रकरणातील सहआरोपी मनोज चावडा (20) हा चालवतो. त्याने 600 पास छापले आणि ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वितरित केले, नागर म्हणाला की, त्यांनी 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान 400 पास विकले.

भावा मकवाना, राज मकवाना आणि यश मेहता अशी उर्वरित आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण १९ वर्षांचे असून ते कांदिवलीचे रहिवासी आहेत. त्यांचा साथीदार केयूर नाय हा 20 वर्षांचा आहे, तर प्रेम चावडा (19) हा अजूनही फरार आहे.

गेल्या काही वर्षांत नवरात्र मोहत्स्वाचा काळात मोठ्या शहरात होणाऱ्या गरबा कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमणात गैरप्रकार वाढले आहेत. त्यामुळे हे गैरप्रकार रोखण्यासाठी आयोजक पासशिवाय कार्यक्रमात प्रवेश देत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: दोन जवानांचे दहशतवाद्यांकडून अपहरण, गोळी लागलेली असताना एकजण तावडीतून निसटला; दुसऱ्या जवानाचा...

Rahul Gandhi Reaction: "हरियानाच्या अनपेक्षित निकालाचे..."; निवडणूक निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

16 Sixes, 48 Fours: वत्सल पटेलची आतषबाजी अन् संघाच्या ४५० धावा, ३४१ धावांनी जिंकला सामना

Vidhansbha Election: भाजपने रिपीट केला २०१९चा पॅटर्न! यंदाही पुण्यात शिवसेनेला स्थान नाही

Mumbai Crime: राज्यात नेमकं चाललंय काय? वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; एकाला अटक, दुसरा फरार

SCROLL FOR NEXT